‘या’ राज्यातील १८ आमदार लवकरच भाजपमध्ये, सुनील देवधर यांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलरच्या १२ आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केल्यानंतर आता आंध्रप्रदेशात देखील अशाच प्रकारचे राजीमाना सत्र रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे आंध्रप्रदेश प्रभारी सुनील देवधर यांनी दावा केला आहे कि, लवकरच तेलगु देशम पार्टीचे विधानसभेचे १८ आमदार आणि ३० विधानपरिषदेचे आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

त्याचबरोबर त्यांनी आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देशम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्याविषयी गौप्यस्फोट करताना म्हटले कि, ते पुढील दोन वर्षात जेलमध्ये असतील. त्याचप्राणे भाजप राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असेल. त्यामुळे सुनील देवधर यांच्या दाव्यानंतर आता चंद्राबाबू नायडू आणि तेलगु देशम पार्टीच्या गोटात सध्या चिंता पसरली असून हे आमदार पक्ष सोडून गेल्यास तेलगु देशम पार्टीचे आंध्रप्रदेशातील अस्तित्व जवळपास संपल्यात जमा होईल. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षातील विविध राज्यातील आमदार भाजपमध्ये प्रवेश करत असून भाजप आपली पाळेमुळे आणखी घट्ट करत आहे.

दरम्यान , नुकत्याच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत वायएसआर ने मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवत राज्यातील १७५ पाकी १५१ जागांवर विजय मिळवून आपले सरकार होते. जगन मोहन रेड्डी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेत कपात केली होती. त्याचप्रमाणे त्यांच्या सरकारी बंगल्यावर कारवाई करत त्यावर बुलडोजर चालवला होता.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ कारणामुळे येत पुरुषांमध्ये वंध्यत्व

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान