Birthday SPL : ना सिनेमे, ना रेडिओमध्ये नोकरी ! मुंबईत आल्यानंतर ‘हे’ काम करत होते सुनील दत्त

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आणि संजय दत्त यांचे वडिल सुनील दत्त यांचा आज वाढदिवस आहे. आज ते आपल्यात नाहीत. एका कलाकारासोबतच ये यशस्वी नेताही होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांचा संघर्ष जाणून घेणार आहोत. सुनील दत्त यांचा जन्म 6 जून 1929 रोजी पंजाबमध्ये झाला होता.

सुनील दत्त फारुख शेखच्या जीना इसी काम नाम है या शोमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मुंबईत नवीन आल्यानंतर काय काम केलं होतं याचा खुलासा केला होता. अॅक्टर होण्याआधी ते रेडिओमध्ये होते. अनेक बड्या कलाकारांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत. याशिवाय त्यांनी आणखी एक काम केलं आहे. ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे.

जेव्हा सुनील दत्त नवीन मुंबईत आले होते. तेव्हा त्यांनी बस डेपोमध्ये नोकरी केली होती. त्यांचं शॉप रेकॉर्डरचं काम होतं. त्यांना याचा हिशोब ठेवावा लागत होता की बस आल्यानंतर त्यात किती रुपयांचं डिझेल टाकावं लागत आहे. बसला काय डॅमेज झालं का हेही पहावं लागत होतं आणि त्याचंही रेकॉर्ड ठेवावं लागत होते. दुपारी अडीच ते रात्री साडे अकरापर्यंत त्यांना हे काम करावं लागत होतं. यावेळी त्यांचं कॉलेजही सुरू होतं.

सुनील यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी रोमँटीक हिरोपासून तर डाकू पर्यंत अनेक रोल केले आहेत. त्यांनी मदर इंडिया, साधना, सुजाता, छाया, गुमराह, वक्त, खानदान, मेरा साया, हमराज, पडोसन, रेश्मा और शेरा, जख्म, नागिन, जानी दुश्मन, राज तिलक, फूल आणि मुन्नाभाई एमबीबीएस अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.