सुनील गावस्कर यांनी टीम इंडियातील भेदभाव आणला समोर

पोलीसनामा ऑनलाइन – आर. अश्विन (R Ashwin) आणि टी. नटराजन (T Natarajan) या गोलंदाजांना संघात दुट्टपी पणाची वागणूक मिळत असल्याचा दावा भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी केला असून, त्यांनी भारतीय संघातील भेदभाव समोर आणला आहे. येथे खेळाडूंनुसार नियम बदलले जातात, असा आरोपही त्यांनी केला आहे.

एका इंग्रजी संकेतस्थळास बोलताना गावस्कर म्हणाले, पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराट सुट्टीवर गेला आणि त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी परतण्याची परवानगी मिळाली, असे म्हणत त्यांनी कर्णधार विराट कोहलीचा समाचार घेतला. दुसरीकडे आयपीएलदरम्यान टी. नटराजन यास मुलगी झाली असून, त्याला अजूनही मुलीस भेटता आले नाही.

देशातील क्रिकेट चाहत्यांना कसोटीत ३५० विकेट्स नावावर असलेला अश्विन संघात खेळावा असे वाटते. मात्र, एका सामन्यातील खराब कामगिरीमुळे त्यास पुढच्या सामन्यावेळी पुढील बाकावर बसवले जाते. नावाजलेल्या फलंदाजाबद्दल असे घडत नाही. टी. नटराजनला केवळ नेट गोलंदाज म्हणून ऑस्टेलियात ठेवले गेले, याकडेही गावस्करांनी लक्ष वेधून घेतले.

दुसऱ्या कसोटीसाठी रवींद्र जडेजा तंदुरूस्त

पहिल्या कसोटी सामान्याच्यावेळी पृथ्वी शॉ अपयशी ठरल्यानंतर सुबमन गिलला संधी मिळण्याची शक्यता असून, तो मयांक अग्रवालसोबत सलामीस खेळू शकतो. तर विराटच्या जागी लोकेश राहुल हा पर्याय सक्षम आहे. त्याच्यासोबत चेतेश्वर पुजारा व अजिंक्य राहणे ही जोडी, हनुमा विहरीनेही निशाण केल्याने त्याच्याजागी रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू खेळवण्याचा विचार कर्णधार रहाणे नक्की करेल. वृद्धीमान सहाच्या जागी रिषभचा पर्याय आहे. शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळेल.