सुनील गावसकर विराट कोहलीवर भडकले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या अँटिगा कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नव्हते. या सामन्यात रविचंद्रन अश्विन ऐवजी एकमेव फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजाचा समावेश होता. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मात्र रविचंद्रन अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न देण्याच्या कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

सुनील गावस्कर म्हणाले, ‘मला विशेष वाटते की असा महान विक्रम असलेला एक खेळाडू आणि विशेषत: वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. हा अत्यंत धक्कादायक निर्णय आहे. मला आश्चर्य वाटले.’

दरम्यान ३२ वर्षीय स्टार ऑफ स्पिनर अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार याआधी विक्रम नोंदविला आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत कॅरेबियन संघाविरुद्ध ११ कसोटी सामन्यांच्या २१ डावांमध्ये ६० बळी घेतले आहेत. २०१६ मध्ये अखेरच्या वेळी जेव्हा भारताने कॅरेबियन दौरा केला होता. तेव्हा अश्विनने चार कसोटी सामन्यात १७ बळी घेतले होते. अश्विनची चारही कसोटी शतके वेस्ट इंडीजविरुद्ध झाली असून ५५२ धावांसहीत त्याच्या फलंदाजीची सरासरी ५० च्याही वर आहे.

अजिंक्य राहणेकडून निर्णयाचे समर्थन :
यावर अजिंक्य रहाणे म्हणाला, ‘जडेजाला अश्विनसारख्या खेळाडूंपेक्षा जास्त पसंती देण्यात आली होती कारण या विकेटवर तो एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होऊ शकते आणि संघाच्या सहाव्या फलंदाजाची गरजही तो पूर्ण करतो.’ त्याचबरोबर हनुमा विहारी देखील या खेळपट्टीसाठी उपयुक्त गोलंदाजी करू शकतो असे वाटते. अशा परिस्थितीत प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात हा निर्णय झाला की हे संघाचे संतुलन असावे. अश्विन आणि रोहित सारख्या खेळाडूंना राखीव ठेवण्याचा निर्णय नेहमीच कठीण असतो, पण हे सर्व संघासाठी करण्यात आल्याचेही रहाणे म्हणाला.

आरोग्यविषयक वृत्त –