सुनील गावस्करांच्या समर्थनार्थ उतरले ‘हे’ दिग्गज, दिलं अनुष्का शर्माला उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे माजी विकेटकीपर फलंदाज फारुख इंजिनियर हे माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांच्या समर्थनासाठी उतरले आहेत. ज्यांनी नुकतेच विराट कोहलीच्या फॉर्मवर चर्चा करताना त्याची पत्नी अनुष्का शर्माचे नाव घेतले होते. यावर काही लोकांनी गावस्कर यांच्यावर टिका केली होती. ट्विटर यूजर्सने गावस्कर यांच्यावर अनेक कमेंट्स केल्या होत्या.

अनुष्का शर्माने सुद्धा एक पोस्ट करून गावस्कर यांना प्रश्न विचारले होते. फारुख इंजिनियरने पाकिस्तानी ऑब्जर्व्हरशी बोलताना म्हटले की, आम्हा भारतीयांमध्ये सेंस ऑफ ह्यूमरची कमतरता आहे.

फारुख इंजिनियर म्हणाले, जर सुनीलने विराट आणि अनुष्काबाबत काही म्हटले आहे तर ते गंमतीने म्हटले असणार, वाईट हेतूने नव्हे. मी गावस्करला खुप चांगला ओळखतो, म्हणून सांगू शकतो की, त्यांनी म्हटले असेल तर ते गंमतीने म्हटले असेल.

इंजिनियर म्हणाले, माझे प्रकरण सुद्धा लोकांनी अशाच गांभीर्याने घेतले होते आणि अनुष्काने वक्तव्य केले होते. इंजिनियर हे सुद्धा 2019 वर्ल्डकपच्या दरम्यान अशाच वादात सापडले होते.

फारुख इंजिनियर म्हणाले, टीम इंडियाचे सेलेक्टर्स विराटची पत्नी अनुष्का शर्माला चहाचा कप देत होते. यानंतर अनुष्का शर्माने ट्विटरवर पोस्ट टाकून आपली नाराजी व्यक्त केली होती. सुनील गावस्करने सुद्धा आपल्या या प्रकरणात स्पष्टीकरण दिले होते की, वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे.