रिकाम्या स्टेडियममध्ये IPL : सचिनने म्हटले – ‘प्रेक्षकांकडून उर्जा मिळते, गावस्कर यांनीही मांडले आपले मत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – बीसीसीआय रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल खेळवण्याच्या तयारीत असले तरी क्रिकेटच्या देवाचे मत थोडे वेगळे आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे म्हणणे आहे की, केवळ इंडियन प्रीमियर लीगच नव्हे, तर अन्य कोणतीही मॅच प्रेक्षकांशिवाय होऊ नये, कारण फॅन्समुळेच खेळाडूंना उर्जा मिळते. कमीत-कमी स्टेडियममध्ये 25 टक्के तरी प्रेक्षकांना मंजुरी मिळाली पाहिजे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सचिनने, टी-20 विश्व कपचा निर्णय ऑस्ट्रेलियालाच घेण्यास सांगितले. सचिन म्हणाला, सर्व स्थिती पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढे जावे. यापूर्वी लिटिल मास्टर सुनील गावस्करने सुद्धा आयपीएलच्या भवितव्याबाबत आपले मत मांडले होते.

सुनील गावस्करचे म्हणणे आहे की, या वर्षी सप्टेंबरच्या सुरूवातीला श्रीलंकामध्ये इंडियन प्रीमियर लीग होऊ शकते. कारण कोरोना व्हायरस महामारीतून बाहेर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्व कपच्या यजमानपदाची शक्यता निश्चित केली आहे.

भारताच्या या माजी कर्णधाराचे म्हणणे आहे की, ऑस्ट्रेलिया सरकारने घोषणा केली आहे की, आयोजनात 25 टक्के प्रेक्षक येऊ शकतात. ज्यामुळे ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्व कप होण्याची शक्यता आयपीएलपेक्षा जास्त वाटते. गावस्करने एका न्यूज चॅनलला सांगितले की, ऑस्ट्रेलियात सर्व संघांना बहुतेक तीन आठवडे अगोदर पोहचावे लागेल आणि सात दिवस सरावासाठी मिळतील. 14 दिवसांचे क्वारंटाईनसुद्धा शक्य आहे.

त्यांनी म्हटले की, जर आयसीसीला वाटते की, टी-20 विश्व कप शक्य आहे तर आयपीएल होणे अवघड आहे, कारण टी-20 विश्व कप स्थगित झाला तरच याच्या आयोजनाची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या घोषणेनंतर आता आयपीएल होणे अवघड दिसत आहेत. सप्टेंबरमध्ये श्रीलंका किंवा युएईमध्ये छोटी आयपीएल होऊ शकते.

गावस्करने म्हटले, सप्टेंबरमध्ये मान्सूनमुळे भारतात आयपीएल होऊ शकत नाही. श्रीलंकेत सप्टेंबरच्या सुरूवातीला ती शक्य आहे. एकमेकाविरूद्ध दोन-दोन सामने खेळण्याऐवजी सर्व संघ एक-एक सामना खेळू शकतात. कोरोना महामारीनंतर क्रिकेटचा अनुभव वेगळा असणार आहे. विशेषता जेव्हा स्टेडियममध्ये प्रेक्षक नसतील. प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे वातावरण खुपच वेगळे असते. खेळाडूंना ती मजा येणार नाही. याशिवाय खेळाडू एकमेकांची गळाभेट सुद्धा घेऊ शकणार नाहीत.

गावस्करने त्या खेळाडूंबद्दल सहानुभूती दर्शवली जे आयपीएलमध्ये आपले कसब दाखवण्याच्या तयारीत होते. गावस्कर म्हणाले, वाईट तर वाटणार. तुम्ही कितीही वेळ जीममध्ये घालवला तरी मैदानावर खेळण्याची इच्छा असतेच.