सुनील गावस्करांनी दाखवला कोहलीला ‘विराट’ सिक्स, म्हणाले – ‘तुमचा जन्म झाला नव्हता त्यावेळी देखील टीम इंडिया जिंकत होती’

कोलकता : वृत्तसंस्था – बीसीसीआय अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटमधील विजयाची मालिका सुरू केली, असे वक्त्यव्य भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने केले. मात्र त्यांचं हे वक्त्यव्य माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना पटलेलं नसून त्यावरून त्यांनी ‘टीम तेव्हाही जिंकत होती, जेव्हा कोहलीचा जन्मही झाला नव्हता’ असे विराट कोहलीला सुनावले आहे.

विराटच्या वक्त्यव्यावर प्रतिक्रिया देताना सुनील गावसकर म्हणाले की , ‘भारतीय क्रिकेटची सुरुवात 90च्या मध्यंतरापासून किंवा 2000 पासून सुरू झाली. 70 आणि 80 च्या दशकातही भारतीय संघ कसोटी मालिका जिंकत होता. गांगुली आता बीसीसीआयचा अध्यक्ष आहे, याची मलाही कल्पना आहे. त्यामुळेच त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलावेच लागेल. पण, आज मला असं वाटलं की भारतीय क्रिकेटची सुरुवात 2000 किंवा 1994/95पासून झाली. पण, विराटचा जन्म हा 1988चा आहे आणि त्यामुळेच त्याला हे माहित नसावं की 70 आणि 80 तही भारतीय संघ कसोटी मालिका जिंकत होते किंवा अनिर्णीत राखत होते.’

काय म्हणाला होता कोहली –
2000 च्या दशकात सौरव गांगुलीनं भारताच्या लढाऊ वृत्तीचा पाया रचला. त्यांच्या संघापासून हे सुरू झाले आणि त्यानं सुरू केलेली ही विजयी परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. मागील 3-4 वर्षांत आम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ आता मिळत आहे.’

भारत विरुद्ध बांगलादेश डे-नाइट कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला. डे-नाईट कसोटी सामन्यात टीम इंडियानं तिसऱ्याच दिवशी बांगलादेशचा एक डाव आणि 46 धावांनी दारुण पराभव केला. या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियानं 2-0 असं वर्चस्व गाजवलं आहे. टीम इंडियाचा भारतीय भूमीवरचा हा सलग 12 वा कसोटी विजय ठरला.

Visit : Policenama.com