ICC World Cup 2019 : महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजीबाबत आता सुनिल गावसकर यांचं मोठं वक्‍तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवावर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी देखील धोनीच्या फलंदाजी क्रमावर प्रश्न उपस्थित केला आहे. सुनील गावस्कर यांनी याविषयी बोलताना म्हटले आहे कि,भारताच्या सलामीच्या तीन विकेट पडल्यानंतर महेंद्रसिंग धोनी याने फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर यायला हवे होते.

गावस्कर यांनी भारतीय संघाच्या नियोजनावर टीका करताना म्हटले कि, फलंदाजीचा क्रम हा नेहमी परिस्थितीनुसार बदलायला हवा. मात्र न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाने क्रमवारीत फार मोठी चूक केली आणि याची भारतीय संघाला मोठी किंमत मोजावी लागली. ज्यावेळी भारताने संघाने तीन विकेट गमावल्या त्यानंतर हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत हे फलंदाजी करत होते.

पंड्या आणि पंत यांच्या फलंदाजीविषयी ते म्हणाले कि, दोघेही एकाच शैलीचे फलंदाज आहेत. त्यामुळे दुसऱ्या बाजूला धोनी फलंदाजीसाठी हवा होता. ज्यामुळे एका बाजूने मोठे फटके आणि एका बाजूने संयमाने फलंदाजी करता आली असती. मात्र शेवटी दोघेही मोठे फटके खेळण्याच्या नादात बाद झाले आणि याचा मोठा फटका भारताला बसला. गावस्कर यांच्या मते धोनी संयमाने फलंदाजी करतो. यामुळे त्याने पंत किंवा पंड्या यांना शांतपणे आणि उत्तम पद्धतीने समजावत फलंदाजी केली असती. कर्णधार कोहली याने चुकीच्या वेळी पंत आणि पंड्या यांना फलंदाजीसाठी पाठवले. दोघेही फक्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्या परिस्थितीत धोनी सारख्या शांत आणि संयमाने खेळणाऱ्या व्यक्तीची गरज होती. असे देखील गावस्कर यांनी म्हटले.

दरम्यान, या स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफमध्ये मोठ्या प्रमाणात बीसीसीआय बदल करणार असल्याचे बोलले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या