Sunil Holkar Death | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन

पोलीसनामा ऑनलाईन : Sunil Holkar Death | हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील मराठमोळे अभिनेते सुनिल होळकर यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळं संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळं अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

https://www.instagram.com/p/CkGy-Vurcqq/?utm_source=ig_embed&ig_rid=149a6180-e388-4f21-92f8-9b412f41264f

अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत त्यांनी बरीच वर्ष काम केलं. अभिनेता आणि निवेदक अशी त्यांची विशेष ओळख होती. जवळपास 12 वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची प्रामाणिक सेवा केली. याचमुळे मराठी मनोरंजन विश्वातून सुनील यांच्या निधनाची हळहळ व्यक्त केली जात आहे. नाटक आणि मालिकांसोबतच त्यांनी अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं. हिंदी मालिकाविश्वात ते सहाय्यक भूमिकांसाठी विशेष ओळखले जायचे. (Sunil Holkar Death)

‘गोष्ट एका पैठणीची’, ‘मोरया’ या सारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चमक दाखवली.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘मॅडम सर’, ‘मि. योगी’ अशा अनेक मालिकांतून तर ‘भुताटलेला’ वेब सिरीज
मधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या माघारी पत्नी एक मुलगा असा परिवार आहे.

Web Title :- Sunil Holkar Death | sunil holkar passes away he acted in taarak mehta ka ooltah chashmah and gosht eka paithanichi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bombay High Court | मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा, पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

Chandrashekhar Bawankule | ‘…त्यामुळेच ते दुसऱ्यांवर टीका करतात’; चंद्रशेखर बावनकुळेंची काँग्रेसवर टीका