Sunil Kedar | सत्यजीत तांबे प्रकरणात नाना पटोले यांच्यावर कारवाई होणार का? काँग्रेस नेते स्पष्टचं बोलले; म्हणाले…

Sunil Kedar Plea Rejected In High Court | bombay mumbai high court rejected congress leader sunil kedar plea
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sunil Kedar | नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान (Nashik Graduate Constituency) काँग्रेस पक्षात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना देण्यात आलेला काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म खोटा होता. असा खळबळजनक दावा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीवर केला आहे. तर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सत्यजीत तांबे यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती. अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यातच कालपासून सत्यजीत तांबे आणि नाना पटोले एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यावर माजी मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल केदार (Sunil Kedar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करणार का? या प्रश्नावर त्यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे.

 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुनिल केदार म्हणाले की, ‘हे जे काही घडले ती चांगली घटना नाही. ती दुर्दैवी घटना आहे. या सगळ्याची शहानिशा होणे गरजेचे आहे. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने सर्व काँग्रेस (Congress) जनांना हेच सांगेल की सध्याची परिस्थिती ही एकमेकांना समजून घेण्याची आहे. पक्ष कमजोर होईल, अशी विधाने करणे किंवा कृती करणे योग्य होणार नाही. एकत्र बसून घरातला विषय घरातच सोडविण्यासंबंधी भूमिका वठविली पाहिजे. या सर्व घडामोडींमुळे पक्ष कमजोर झाला आहे. पण अजूनही पक्ष नेतृत्व एकीकडे देशात पक्ष मजबूत करायला निघालेले असताना आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घरातले प्रश्न घरात बसूनच सोडवले पाहीजेत, असे माझे स्पष्ट मत आहे.’ असे यावेळी बोलताना सुनिल केदार (Sunil Kedar) म्हणाले.

दरम्यान, सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत, काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर आरोप केले होते. यावेळी बोलताना तांबे म्हणाले होते की, मला दोन चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र रचण्यात आलं. त्यासाठी स्क्रीप्ट तयार होती. त्याचाच एक भाग म्हणून माझ्या माणसाला बोलवून बंद पाकिटात फॉर्म देण्यात आले. ते फॉर्म चुकीचे निघाले. नंतरही आम्हाला चुकीचा फॉर्म देण्यात आला. ते म्हणतात की मुलाने उभे राहायचे की वडिलांनी उभे राहायचे, हा निर्णय तांबे परिवाराला घ्यायचा होता.मग माझ्या वडिलांची उमेदवारी दिल्लीतून का जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव दिल्लीतून जाहीर झाले नाही. एकाच उमेदवाराचे नाव दिल्लीतून का जाहीर झाले. हा एक कट होता. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना बदनाम करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता.’ असा आरोप सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर केला आहे.

तर, यावर प्रतिउत्तर देताना काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले होते
की, आरोप म्हणण्यापेक्षा त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. स्पष्टीकरण देताना त्यांनी खोटे आरोप केले आहेत.
हे अतिशय क्लेशदायक आहे. ते जिंकले सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं.
पण ज्या काही गोष्टी घडल्या त्या कशामुळे घडल्या? याचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही.
त्यांनी आरोप केला की, अमरावती आणि नागपूरचे एबी फॉर्म दिले होते. पण त्यांना जे फॉर्म पाठवले होते,
ते फॉर्म बाळासाहेब थोरात यांचे सहकारी सचिन गुंजाळ (Sachin Gunjal) यांच्याद्वारे पाठवले होते.
त्याचे स्क्रीनशॉटही त्यांना पाठवले होते, व्हॉट्सॲपवर त्यांचा ‘ओके’ असा रिप्लाय आला आहे,
हे कोरे एबी फॉर्म आहेत, याचे पुरावे आमच्याकडे आहेत.’ असे अतुल लोंढे म्हणाले.

 

Web Title :- Sunil Kedar | congress mla reaction on nana patole and satyajeet tambe controversy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Khadse | ‘…त्यावेळी भाजपला बिनविरोधची आठवण झाली नाही;’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची भाजपवर टीका

Prakash Ambedkar | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…

Pune Crime News | चोर्‍या करणार्‍या तडीपार गुन्हेगाराकडून 3 गुन्हयांची उकल; समर्थ पोलिसांची कामगिरी

Total
0
Shares
Related Posts
Amravati Assembly Constituency | mla sulbha khodke suspended from congress for six years for doing anti party activities she likely to join ajit pawar ncp

Amravati Assembly Constituency | पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन; आता सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत

Sayaji Shinde On Sushma Andhare | sushma andhare criticism on ncp ajit pawar entry and now the sayaji shinde counterattack

Sayaji Shinde On Sushma Andhare | ‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा; शिंदेंचा पलटवार; म्हणाले – ‘मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही’