Sunil Raut | ‘संजय राऊतांच्या भोंग्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात’, सुनील राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) ईडीने (ED) अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बोचरी टीका केली होती. ‘सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झाला’, असे शिंदे म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला आता संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘संजय राऊतांच्या भोंग्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात’ अशा शब्दात सुनील राऊतांनी (Sunil Raut) शिंदेंना उत्तर दिलं आहे.

 

प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील राऊत (Sunil Raut) यांना मुख्यमंत्र्यांच्या टीकेबाबत विचारण्यात आले. यावेर बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत यांचा भोंगा सुरु होता, म्हणूनच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) झाली. महाविकास आघाडीमुळे एकनाथ शिंदे यांना नगरविकास (Urban Development) खाते मिळाले. हा भोंगा वाजला नसता तर शिंदेंना नगरविकास खाते मिळाले असते का? हा भोंगा वाजला नसता तर एकनाथ शिंदे मंत्री झाले असते का? शिंदे यांना जे काही मिळाले ते या भोंग्यामुळेच, अशा शब्दात राऊतांनी शिंदेंना टोला लगावला.

 

संजय राऊत नेहमी भाजपच्या (BJP) विरोधात बोलत होते. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) कमजोर करण्याचे षडयंत्र आहे. त्यामुळे बोगस प्रकरणे त्यांच्यामागे लावली.
ईडी काहीही आरोप लावेल, असे सुनील राऊत म्हणाले. तसेच जो भाजपला सरेंडर होतो, त्यांना क्लिनचीट मिळते.
पण संजय राऊत ईडीला सामोरे गेले. यातून ते परफेक्टपणे बाहेर पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Web Title :- Sunil Raut | sanjay raut ed arrest you became chief minister because of sanjay raut sunil raut criticizes eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Money Laundering Case | मनी लॉन्ड्रिंग प्रकरण ; National Herald सहित 12 ठिकाणांवर ईडीचे छापे

 

Ayurvedic Remedies for stomach worms | पोटातील जंत झाल्याने त्रस्त आहात का, ट्राय करा हे आयुर्वेदिक उपाय

 

Pune Crime | पुण्यातील कर्वेनगर परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त