सुनील चराटे यांची पुणे जिल्हा गटई सेल अध्यक्षपदी नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्हा गटई सेलच्या अध्यक्षपदी सुनील रुपचंद चराटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. चर्मकार समाजाचे नेते व राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बाबुराव माने यांच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे . याबाबतची माहिती राष्ट्रीय चर्मकार संघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ कदम यांनी दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a160eb50-d04e-11e8-b26b-ef152e816d87′]

राष्ट्रीय चर्मकार संघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ कदम म्हणाले की , “आजपासून पुणे जिल्हा गटई सेलच्या अध्यक्षपदाची पदाची जबाबदारी सुनील चराटे स्वीकारतील. पदाची जबाबदारी स्वीकारण्याबरोबरच त्यांनी संघटनात्मक बांधणीचे काम सुरु करावे . संघटनेची ध्येय धोरणे तळागाळातील बहुजन जनतेपर्यंत पोहचवावी. आपला लढा सर्व बहुजन समाजातील वंचीताना न्याय देण्यासाठी आहे . त्यांच्या प्रश्नवर जनमत करून लढा उभारावा. संघटनेच्या ध्येय उद्धिष्टाना कोठेही बाधा येऊन देऊ नये. संघटनेचे स्वाभिमानी विचार बळकतकरण्यासाठी कसोटीने प्रयत्न करावेत.”

[amazon_link asins=’B06XCJFWHJ,B00KJI2GIM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a7fbf0de-d04f-11e8-b21a-717390b97b29′]

मजुरीसाठी बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश 
मुंबई : उद्योगांमध्ये कमी पगारात राबवणाऱ्या कोवळ्या हातांच्या तस्करीचे प्रकार वाढतच आहेत. कारखाने आणि छोट्या छोट्या युनिटमध्ये काम करण्यासाठी मुलांची  तस्करी करणाऱ्या टोळीला  मुंबई पोलिसांनी पकडले आहे. बिहार आणि नेपाळहून मुलांना घेऊन मुंबईत आलेल्या पाच जणांना शनिवारी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या तावडीतून १३ ते १६ वर्षे वयोगटातील २१ जणांची सुटका करण्यात आली आहे.

बालमजुरीविरोधात काम करण्याऱ्या ‘प्रथम’ संस्था आणि ‘पालवी चाइल्डलाइन’ या संस्थेच्या प्रतिनिधींच्या सतर्कतेमुळे सदर घटना उघडकीस आली आहे. मुलांची तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद सादिक मन्सुरी, सुकेश्वर राऊत, एकलाक हसन, जाफर शेख, अब्दुल शेख या याच जणांविरोधात नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे . या टोळीतील अजून अनेक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या टोळीमध्ये आणखी काहीआरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शनिवारी सकाळी कर्मभूमी एक्स्प्रेसने काहीजण  मुलांना घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनसला येणार होते.बालमजुरीविरोधात काम करण्याऱ्या ‘प्रथम’ संस्था आणि ‘पालवी चाइल्डलाइन’ या संस्थेच्या प्रतिनिधींना बिहार आणि नेपाळमधून अल्पवयीन मुलांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. या दोन्ही संस्थांनी ही माहिती मुंबई पोलिसांच्या बालसहायक पोलिस युनिटला दिली. युनिटचे सहायक पोलिस आयुक्त माने यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी सापळा लावला. परंतु, कर्मभूमी एक्स्प्रेस कुर्ला टर्मिनसऐवजी ठाणे स्थानकात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनीही कुर्ला येथून ठाण्याच्या दिशेने धाव घेतली. शनिवारी दुपारी मुलुंड परिसरातून पोलिसांनी २१ मुलांना ताब्यात घेतले. ही सर्व मुले अल्पवयीन असून २१पैकी आठ जण नेपाळमधील तर १३ जण बिहारचे आहेत. या सर्वांची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे.