अभिनेता सुनील शेट्टीचा ‘पहलवान’मधील जबरदस्त ‘लुक’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी आणि सुदीप यांच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. पहलवान असं या सिनेमाचं नाव आहे. नुकतंच या सिनेमातील पहिलं गाणं आणि सुनील शेट्टीचा लुक रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याचं नाव जय हो पहलवान आहे. या गाण्यात सुदीप आणि सनीलचा जबरदस्त डान्स दिसत आहे.

image.png

या सिनेमात सुनील आणि सुदीप दोघेही पैलवानकी करताना दिसणार आहेत. साधरणपणे गाणे स्टार्सवर शुट केले जाते किंवा स्टार्स त्यात डान्स करताना दिसतात. पंरतु या गाण्याची खासियत अशी की, या  गाण्यात केवळ फोटो आणि लिरिक्सचा समावेश आहे. या गाण्यात सुनील आणि सुदीपचे रिहर्सल करतानाचे काही सीन्सही समाविष्ट करण्यात आले आहेत.

https://youtu.be/oAAwRHjtmTQ

स्वरुप खानने हे गाणं गायलं आहे. आस्था आणि सजीत शेट्टीने हे गाणं लिहिलं आहे. या गाण्यात रॅपही आहे. जो व्यासरराज आणि एमसी विक्कीने केला आहे. सुनील शेट्टीच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर व्हाईट धोतर आणि कुर्त्यात तो दिसत आहे. या लुकमध्ये सुनील खूपच हँडसम वाटत आहे. सोबतच त्याने पिंक कलरचा फेटाही बांधला आहे. चाहत्यांना हे गाणं आणि सुनील शेट्टीचा लुक प्रचंड आवडला आहे.

image.png

या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर हा अ‍ॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीने भरपूर असा सिनेमा असणार आहे. हा सिनेमा १२ सप्टेंबर २०१९ रोजी रिलीज होणार आहे. २५०० स्क्रिनवर हा सिनेमा दाखवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी याचा टीजरही रिलीज झाला होता.

image.png

 

image.png
image.png

आरोग्यविषयक वृत्त