सुनील शेट्टीची लेक अथियानं शेअर केला ओव्हरसाईज शर्टमधील फोटो ! KL राहुलनं केली ‘अशी’ कमेंट

पोलीसनामा ऑनलाईनबॉलिवूड स्टार सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या अफेअरची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होताना दिसत आहे. दोघांनी यावर अद्याप काह कमेंट केलेली नाही.
पंरतु त्यांचे काही फोटो समोर यातून ज्यातून चाहत्यांना सारं काही लक्षात येतं.

अलीकडेच अथियानं एक ओव्हरसाईज शर्ट घालून एक फोटो क्लिक केला जो चाहत्यांसोबतत तिनं शेअल केला आहे. या फोटोवर केएल राहुल सोबतच चाहत्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त करत कमेंट केल्या आहेत.

अथियानं इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिनं ओव्हरसाईज व्हाईट शर्ट घातला आहे. फोटो शेअर करतना अथिया म्हणते, “पार्टी ऑफ टू.” तिच्या या फोटोवर केएल राहुलनं कमेंट केली की, “चांगला शर्ट आहे.” चाहत्यानीही यावर कमेंट करत अथियाचं कौतुक केलं आणि केएल राहुलचीही मजा घेतली. एकानं कमेंट करत लिहिलं की, “भाई तुझा शर्ट आहे का हा ?” एकानं म्हटलं मला माहिती आहे हा तुझा आहे राहुल.

https://www.instagram.com/p/B9ygxcZpNRE/

अथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर हिरो या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. 2015 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. अथिया काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत मोतीचूर चकनाचूर सिनेमात दिसली होती. हा सिनेमा खास काही चालला नाही. तिनं मुबारकां, नवाबजादे या सिनेमातही काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B6yFWR_hpgz/

https://www.instagram.com/p/B6sM0nQH99V/

https://www.instagram.com/p/B68PPdpHfxf/