ADV

Sunil Tatkare On Jayant Patil | प्रदेशाध्यक्ष पदावरून सुनील तटकरेंचा जयंत पाटलांवर हल्लाबोल;’ काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sunil Tatkare On Jayant Patil | जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पक्षातच आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. याबाबत सुनील तटकरेंनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “व्यासपीठावरून सांगावं लागलं. फक्त चार महिने मी आहे. चार महिने सोशल मीडियावर काही बोलू नका. हे सर्व त्यांना सांगावं लागलं. चार महिन्यानंतर राष्ट्रवादी अध्यक्षपद सोडणार आहे. (Sharad Pawar NCP)

ज्या काही तक्रारी असतील त्या पवार साहेबांकडे करा. निवडणुकीच्या यशानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना या पद्धतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वासमोर बोलाव्या लागतात. याचा अर्थ नेमकां काय? म्हणून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड टाकू नये, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. (Ajit Pawar NCP)

दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत तटकरे म्हणाले, ” ज्या ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य आहेत, त्या मतदारसंघामध्ये संघटनेचा व्यापक दौरा सुरु करण्यासाठी पक्षाच्या वर्धापनदिनी सुतोवाच केलं होतं. म्हणूनच मी नगरपासून माझ्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेशही आहेत. नगर शहरातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातही आहेत. नगर जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघाचे सुद्धा दोन भाग आहेत.
एक दक्षिण नगर आणि दुसरा नगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघ.
त्या निवडणुकीमध्येही कार्यकर्त्यांशी संवाद साधून आढावा घेण्यात आला.
संघटनेची बांधणी करण्यासाठी व्यापक जनाधार निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रात सुरुवात करणं, हाच या दौऱ्याचा उद्देश आहे.” असे तटकरेंनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS-BJP-Mahayuti | महायुतीत चौथा वाटेकरी, मनसेने महायुतीकडे ‘या’ 20 जागा मागितल्या? ; जाणून घ्या

RSS On BJP About Support Of Ajit Pawar | पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपाला सुनावलं

Sassoon Hospital | ससूनच्या डॉक्टरांची खाजगी मेडिकलवाल्यांशी ‘दुकानदारी’; ससून रुग्णालयाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, कारवाई होणार? (Video)

Maha Vikas Aghadi | अखेर मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांचा अर्ज मागे