Sunita Dhangar Arrested | नाशिक महानगरपालिकेतील शिक्षणाधिकारी सुनिता धनगरच्या घरात 85 लाख कॅश अन् 32 तोळे सोनं सापडलं (Video)

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Sunita Dhangar Arrested | नाशिक महानगरपालिकेतील Nashik Municipal Corporation शिक्षणाधिकारी Education Officer सुनिता सुभाष धनगर (57) Sunita Dhangar Arrested यांना 50 हजार तर लिपीक नितीन अनिल जोशी (Nitin Anil Joshi) यांना 5 हजार रूपयाची लाच (Nashik Bribe Case) घेतल्यानंतर नाशिकच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाने त्यांना रंगेहाथ पकडलं होते. दरम्यान, सुनिता धनगर यांच्या घराची झडती घेतली असता मोठं घबाड अ‍ॅन्टी करप्शनच्या हाती लागले आहे. सुनिता धनगर यांच्या घरातून तब्बल 85 लाख रूपये कॅश आणि 32 तोळे सोनं सोपडलं आहे. ते एसीबीने जप्त केले आहे. (Nashik ACB Trap)

सुनिता धनगर (Sunita Subhas Dhangar) यांच्या नावावर 2 फ्लॅट आणि एक प्लॉट देखील असल्याची माहिती समोर आलेली आहे (ACP Trap News). धनगर ज्या फ्लॅटमध्ये रहावयास आहेत तो फ्लॅट थ्री बीएचके असून त्याची किंमत सुमारे दीड कोटी एवढी आहे. त्यांचा अडगाव येथे प्लॉट असून एक फ्लॅट टिळकवाडी तर दुसरा फ्लॅट उंटवाडी येथे आहे. याबाबत नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी माहिती दिली आहे. (Sunita Dhangar Arrested)

ट्रॅप बाबत थोडक्यात –

तक्रारदार हे एका शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना सदरील संस्थेने बडतर्फ केले आहे. त्याकामी त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरण नाशिक (Education Tribunal, Nashik) येथे दाद मागितल्याने त्यांच्यावरी बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली होती. तरी देखील सदरील संस्था तक्रारदार यांना सेवेत दाखल करुन घेत नव्हती.

तक्रारदार यांनी मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे सदरील संस्थेवर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी सुनीता धनगर यांनी याबाबत पत्र देण्यासाठी 50 हजार रुपयाची लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे (Nashik ACB) तक्रार केली. त्यानुसार पथकाने पडताळणी करुन सापळा रचला. सुनीता धनगर यांना तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर मनपा कर्मचारी नितीन जोशी यांनी सदर पत्र बनवण्याच्या मोबदल्यात 5 हजार रुपये लाच स्वीकारली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे
(PI Sandeep Ghuge), पोलीस निरीक्षक गायत्री जाधव (PI Gayatri Jadhav) पोलीस अंमलदार एकनाथ बाविस्कर,
प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title :  Sunita Dhangar Arrested 85 lakh cash and 32 tola gold found in Nashik Municipal Corporation Education Officer Sunita Dhangar’s house (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुण्यातील बिल्डरविरूध्द गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ! पोलिस निरीक्षकासह उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश

Maharashtra Talathi Bharati 2023 | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेगाभरती, शासनाकडून आदेश जारी

MP Sanjay Raut | ‘बेईमान्यांवर वीर सावरकरही थुंकले होते, मग मी जी कृती…’, संजय राऊतांची प्रतिक्रिया

MP Sanjay Raut | अजित पवारांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले- ‘धरणामध्ये XXX…’