सरपंचपदी सुनिता सचिन शिंदे यांची बिनविरोध निवड

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – लासलगांव जवळील पिंपळगाव नजीक येथील ग्रामपंचायत सरपंच पद निवडणुक नुकतीच पार पडली. यात सरपंच पदी सुनिता सचिन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

१३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत मागील सरपंच आवर्तन पध्दतीनुसार राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. दि. २८ मंगळवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडलेल्या निवडीप्रसंगी मंडळ अधिकारी चंद्रशेखर नगरकर यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच कल्पना दादा व्हलगडे, ग्रामपंचायत सदस्य विलास चव्हाण, जिजाबाई वाघ, कल्पणा वाघ, रत्नप्रभा घोडे, शजीवन पांगुळ, चारूदत्त आढाव, भारती महाले उपस्थित होते. निवडणुक प्रसंगी लासलगाव जि.प. गट सदस्य ज्ञानेश्वर जगताप, लामको माजी अध्यक्ष रमेश शिंदे, नामको संचालक प्रकाश दायमा, अरुण खांगळ, हर्षद पानगव्हाणे, सचिन शिंदे, दत्तु खाडे, राजेश कासट, रमेश खोडके व लासलगांव बाजार समितीतील व्यापारी तंटामुक्त अध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, माजी तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठलराव खुटे, मधुकर सरोदे, कैलास खुटे, पो. पाटील भरत फंड, उत्तम वाघ, जगन्नाथ खुटे, राजाराम घोडे, संजय महाले, दिपक कुलकर्णी, भारत माळी, परसराम घोडे, सचिन विंचु, मयुर आवारे, अमोल कुमावत, मानस क्षिरसागर, धनंजय शिंदे, सौ. सेखो, दिपाली चोरडिया, सविता दायमा, वैशाली ठोंबरे, स्मिता क्षिरसागर व इतर ग्रामस्थ, ग्रामविकास अधिकारी शशिकांत कदम, संतोष शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद काशिनाथ खुटे, विवेक माळी, पुंजाराम कदम, प्रविण शिरसाठ, अशोक कापसे उपस्थित होते व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लासलगांव पो. स्टेशन चे पो. कॉ. कोते यांनी बंदोबस्त ठेवला.