‘सूर्यप्रकाश’ दूर करतो जीवनातील ‘अंधकार’ ; जाणून घ्या महत्व आणि लाभ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सूर्य आहे म्हणून हे विश्व अबाधित आहे. सूर्यामुळेच पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे. सूर्याबाबतच्या या गोष्टीच सूर्यप्रकाशाचे महत्व अधोरेखित करतात. आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक लोकांना सूर्यनमस्कार करताना पाहतो. तसेच सूर्याला जल अर्पण करतानाही लोक दिसतात. परंतु, तुम्ही असा कधी विचार केला आहे का, की लोक दररोज असे का करतात? यासाठीच आपण सूर्य आपल्या जीवनातील अंधार कसा दूर करतो याविषयी आज माहिती करून घेणार आहोत.

सूर्यप्रकाशाची काही खास माहिती

* सूर्यापासून मिळणारा प्रकाश हा पृथ्वीवरील उर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे
* हा प्रकाश खूप प्रभावी आणि जीवनदायी आहे
* या प्रकाशात अल्ट्रा व्हायलेट किरणे असतात
* ही किरणे काही बाबतीत लाभदायक असून काहीमध्ये हानीकारक आहेत
* सूर्य प्रकाशाद्वारे मन आणि शरीर दोन्ही चांगले होऊ शकते
* सूर्य प्रकाशापासून आपल्याला व्हिटामिन डी मिळते तसेच सकाळचा सूर्यप्रकाश आपल्यासाठी लाभदायक असतो

सूर्य प्रकाशामुळे आरोग्य राहते चांगले

* सूर्योदय होत असताना सूर्यप्रकाशात पाच मिनिटे उभे राहणे हे आरोग्यासाठी चांगले औषध आहे
* सूर्य प्रकाशात आंघोळ केल्यास टीबी आणि कॅन्सरसारख्या आजारात आश्चर्यकारकरित्या लाभ होतो
* तसेच सूर्यप्रकाशामुळे त्वचारोग बरे होतात
* ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश येतो त्या घरातील लोक अधिक प्रसन्न राहतात
* अशा घरांमध्ये भांडणतंटा, वाद होण्याची शक्यता नसते
* अशक्त लोकांनी सूर्याचा प्रकाश आवश्य घेतला पाहिजे

सूर्यप्रकाशापसून महालाभ

* सकाळी सूर्यप्रकाशात फिरवयास जावे अथवा बसावे
* सूर्यप्रकाशात बादलीभर पाणी ठेवावे आणि या पाण्याने आंघोळ करावी
* स्वयंपाक घरात सूर्यप्रकाश येईल, अशी व्यवस्था करावी
* जर घरात सूर्यप्रकाश येत नसेल तर तो येण्यासाठी व्यवस्था करावी
* अथवा कमीतकमी घरामध्ये दिवसाचा उजेड आला पाहिजे
* जर असे होत नसल्यास घरातील लोकांना आजारपण येण्याची शक्यता असते

सूर्यप्रकाश देईल धन

* सकाळी सर्योदय होण्यापूर्वी उठावे आणि हलक्या लालरंगाची वस्त्रे परिधान करावीत
* एका लाल आसनावर बसून रूद्राक्षाच्या माळेने एकशेआठ वेळा ॐ घृणि सूर्याय नम: या सूर्यमंत्राचा जप करावा
* यावेळी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि ॐ मंत्रजप २७वेळा करावा
* यानंतर हे पाणी घरात शिंपडावे
* असे सलग २७ दिवस केल्यास आपल्या कामांना गती येईल शिवाय थकीत पैसे सुद्धा मिळतील