सनीच्या कडेवर जाताच निशा खुदखदुन हसू लागली

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सनी लियोनी आणि तिची मुलगी निशा यांच्यात आई आणि मुलीची केमेस्ट्री काही वेगळीच आहे. सनीलाही तिच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी जास्त आवडते हे काही लपून नाही. सनी अनेकदा हॉटेल्स किंवा काही इव्हेंटमध्ये फॅमिलीसोबत दिसते.

निशा आणि तिची आई सनी यांच्यातील एक नातं किती सुंदर आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. अलीकडेच सनी पती डॅनियल वेबर आणि मुलगी निशा कौर वेबरसोबत दिसली. तेव्हा निशा मम्मी-पप्पा दोघांचा हात धरून चालताना दिसली. पण अचानक निशा आईच्या कडेवर जाण्यासाठी हट्ट करू लागली. मग रडू लागली. निशाला रडताना पाहून सनीने तिला कडेवर घेतले आणि निशाला शांत केले. सनीने कडेवर घेताच निशाही गप्प झाली आणि खळखळून हसू लागली.

दरम्यान, सनी तीन मुलांची आई आहे. निशा आणि दोन मुले नोह आणि असहर असे आहेत. निशाला सनीने दत्तक घेतले आहे. त्यापुर्वी तब्बल ११ कुटुंबांनी निशाला तिच्या वर्णामुळे नकार दिला होता. मात्र सनीने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता निशाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. आणि सामान्य लोकांप्रमाणे वेटींगमध्ये राहून वेळ घेत सर्व प्रक्रियापुर्ण केली होती.