‘म्हणून सनी देओल आणि हेमा मालिनी संसदेत शेजारी बसणार नाहीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल आणि पत्नी हेमा मालिनी दोघेही लोकसभा निवडणूक विजयी झाले आहेत. सनी देओल यांनी पंजाबच्या गुरुदासपूर मधून विजय मिळवला तर हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथून विजय मिळवला आहे. तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल की, सनी देओल आणि हेमा मालिनी दोघेही संसदेत एकमेकांच्या शेजारी बसणार नाहीत. तुम्हाला वाटेल की त्यांच्या नात्यात मतभेद तर नाही ना ? परंतु असे काही नाही याचे कारण काही वेगळेच आहे.

Hema-Malini

सनी आणि हेमा यांचं शेजारी न बसण्याचं कारण म्हणजे, हेमा मालिनी संसदेत पुढच्या आसनावर बसतील. याला कारणही तसेच आहे. हेमा मालिनी या ज्येष्ठ खासदार असल्याने त्या पुढे बसतील. तर सनी देओल हे सभागृहातील मागच्या रांगेत बसतील कारण सनी देओल हे नवनिर्वाचित खासदार आहेत. सनी देओलबद्दल सांगायचे झाले तर सनी देओल यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदाच निवडून आले आहेत.

Dharmendra

हेमा मालिनी यांची ही मथुरेतून निवडणूक लढवण्याची दुसरी वेळ आहे. 2014 मध्येही त्यांनी निवडणूक लढवली होती. शिवाय त्या मोठ्या मतांनी येथून विजयी झाल्या होत्या. 2014 त्यांनी आरएलडीच्या जयंत चौधरी यांचा पराभव केला होता आणि त्या लोकसभेवर पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. तर सनी देओल यांना भाजपाने पंजाबमधील गुरुदासपूरमधून दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या जागी उमेदवारी दिली होती.