कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील कांबळेंच्या प्रचारार्थ सनी देओल आणि रामदास आठवले प्रचाराच्या मैदानात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – युती होऊन देखील पुणे शहरातील सर्व जागा भाजपकडे आहेत. पुण्याच्या कॅन्टोन्मेंटमधील उमेदवाराच्या प्रचारासाठी अभिनेते आणि भाजपचे खासदार सनी देओल यांनी हजेरी लावली तसेच केंदीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी पुण्यातील भाजपच्या सर्व जागा निवडून येतील असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी सुनील कांबळे यांच्या प्रचारासाठी रामदास आठवले यांनी सनी देओल सोबत प्रचार रॅली काढली विविध पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यामुळे भाजपकडे आकर्षित होत आहेत. त्यांना कोणतेही प्रलोभन न देताही ते भाजपमध्ये येत आहेत, असे आठवले यावेळी बोलताना म्हणाले.

सनी देओल प्रचाराच्या मैदानात
भाजपचे खासदार सानी देओल सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचारासाठी उतरला आहे. सनी देओलने पुण्यात येऊन भाजपच्या उमेदवारासाठी प्रचार रॅलीत आपली हजेरी लावली. सनी देओल यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. चौकाचौकात फटाके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. सनी देओल यांच्यासोबत हस्तांदोलन करण्यासाठीही लोकांची चढाओढ सुरू होती. सुनील कांबळे यांच्या प्रचार रॅलीनंतर सनी देओल हडपसरचे भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांच्या देखील प्रचारासाठी गेले होते.

महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री दिलीप कांबळे, सदानंद शेट्टी, गणेश बीडकर, तुषार पाटील, रफिक शेख, समीर शेंडकर, संदीप लडकत, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, अभय वाघमारे, शिवसेना भाजप कॅन्टोन्मेटचे संतोष इंदूरकर, संदीप लडकत. मुकुंदराव गायकवाड, आरपीआयचे नेते नीलेश आल्हाट, नगरसेविका हिमाली कांबळे, असे युतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी