शाहरूख खानवर एवढा भडकला होता सनी देओल, एका हातानं फाडली पॅन्ट, वाचा पूर्ण स्टोरी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान आणि सनी देओलचा ‘डर’ अजूनही चाहत्यांना आठवत असेल. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट एक क्लासिक सायकोथ्रिलर चित्रपट होता. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. पण या तिघांनी पुन्हा कधीही एकत्र काम केले नाही. होय, ‘डर’ नंतर सनी देओलने यश चोप्राबरोबर कधी काम केले नाही. इतकेच नाही तर त्याने शाहरुख खानसोबतही 16 वर्षे बोललाही नाही.

गेल्या वर्षी एका मुलाखतीत सनीने याबद्दल चर्चा केली होती. जेव्हा सनीला विचारले गेले की, ‘डर’ च्या सेटवर यश चोप्रा आणि शाहरुख त्याला घाबरत होते का ? तेव्हा तो म्हणाला की, कदाचित ते यामुळे घाबरत असेल कारण ते चुकीचे होते. आता ही बातमी पुन्हा सोशल मीडिया तेजीने पसरत आहे.

त्या घटनेची आठवण करून देत सनी म्हणाला की, मी शाहरुखबरोबर एक सीन करत होतो त्यामध्ये तो मला चाकु मारतो. या सीनबद्दल मी यश चोप्राशी बरीच चर्चा केली. मी म्हणालो की, मी चित्रपटात कमांडो आहे. ते पात्र फिट आहे. एखादा मुलगा (शाहरुखची व्यक्तिरेखा) त्याला येऊन कसे मारू शकेल? जेव्हा कमांडोना ते दिसत नाही तेव्हा हे होऊ शकते. कमांडो त्याच्याकडे पहात आहे आणि तो येऊन त्याला चाकू मारतो. मग त्याला कमांडो कसे म्हणता येईल.

तो म्हणाला की, यश जी मोठे होते, म्हणून मी त्यांचा आदर केला आणि मला काहीही बोलता आले नाही. मी खिशात हात ठेवले कारण मला खूप राग आला होता. मला इतका राग होता की त्या रागात मी माझ्या हाताने पॅन्टचे खिशे फाडले होते.

शाहरुखशी 16 वर्षे बोलू न शकल्यावर शाहरुख म्हणाला, ‘मी बोलत नाही असे नाही. मी फक्त स्वत: ला कटऑफ केले होते आणि मी जास्त सोशलाइज करत नाही. त्याची आणि माझी कधी भेट झाली नाही त्यामुळे न बोलण्याचा इथे प्रश्न येत नाही.’