…म्हणून सनी देओल ‘१६’ वर्षे शाहरुख खानशी बोलला नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलने शाहरुख खानसोबत यश चोपडाचा चित्रपट ‘डर’ मध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघांनी आत्तापर्यंत एकत्र काम केले नाही व त्यांच्यामध्ये कोणताच संवाद झाले नाही. नुकत्याच एका मुलाखतीत सनी देओलला प्रश्न विचारला की, शाहरुख खानसोबतच्या नाराजगीचे कारण काय आहे.

सनीने सांगितले की, ‘मी एक सीन करत होतो. ज्यामध्ये शाहरुख मला चाकु मारत आहे. या सीनसाठी यश चोपडासोबत माझे खूप वाद झाले. मी यशला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो की, चित्रपटात मी एक ऑफीसर आहे. मी माझ्या भूमिकेत एक्सपर्ट आहे. मग हा मुलगा (शाहरुख खानची भूमिका साकारणारा) येऊन मला कसे काय सहजपणे चाकु मारतो. जर तो चाकु मारतो आणि मी काहीच करायचे नाही. मग माझा ऑफीसर असून काय उपयोग ? ‘

सनी पुढे म्हणाला की, ‘यश चोपडा वयस्कर असल्याने मी त्यांच्या वयाचा मान राखला. मला त्यावेळी खूप राग आला होता. पण मी स्वतःला सावरले. तेव्हा माझ्या लक्षात आले नाही की, त्यावेळी रागाच्या भरात मी माझी पॅंट फाडली होती. ‘

जेव्हा सनीला विचारले गेले की, १६ वर्षे तुम्ही शाहरुख खानशी का बोलला नाही. त्याने उत्तर दिले, ‘असे काही नाही मी स्वतःला दूर केले आहे. मी जास्त सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह नसतो. त्यामुळे आमचे कधी बोलणे झाले नाही व भेटणे ही झाले नाही.’

२००१ मध्ये एका मुलाखतीत सनी म्हणाला, ‘डर’ चित्रपटातील भूमिका करणे. हा त्याच्या जीवनातील सगळ्यात बेकार अनुभव होता. त्याला खोटे सांगितले होते की, मेकर्स चित्रपटात विलनची भूमिका साकारणार होता. त्याला विचारले की, जर शाहरुखकडून तुला काही अडचणी असेल तर? त्यावेळी सनी म्हणाला की, मी त्याच्यासोबत काम केले आहे. तो सक्षम आहे आणि त्याच्याकडून मला काही अडचणी असेल तर मी यापुढे सावध राहील.

आरोग्यविषयक वृत्त

स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि व्यसन सोडवण्यासाठी ‘हे’ आसन कराच

‘सर्वांगासन’ केल्याने मिळते मनःशांती

महिलांसाठी ‘योग’साधना अतिशय महत्वाची

तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय, मग फक्‍त ‘हे’ असान कराच

वयोवृद्धांसाठी ‘योगा’ हे ‘वरदान’च

योगा कराच ! पण ‘हे’ नक्‍की समजून घ्या

‘योग’ साधनेची सुरुवात करा वज्रासनाने, मिळवा ‘हे’ फायदे

‘अपचना’चा त्रास असणाऱ्यांसाठी ‘हे’ आसन ठरतय ‘रामबाण’ उपाय

Loading...
You might also like