गुरुदासपूरमध्ये सनी देओलला मिळाले ७५४२ ‘पोस्टल’ मतदान

गुरुदासपूर : वृत्त संस्था – देशातील पंजाब राज्याकडे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वांचे विशेष लक्ष लागून होते. त्याचे कारण ही तसेच होते. पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून बॉलीवूड अभिनेता सनी देओल निवडणुकीला उभा राहिला होता. खरं तर देओल कुटुंब मूळचे पंजाब राज्यातीलच आहे.

सनी देओल बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता असल्याने त्याचे चाहते सर्वदूर आहेत. त्याचा फायदा सनी देओलला या निवडुकीत झाला आहे. सनी देओलने गुरुदासपूरमधून विजय मिळविला, पण यात त्याच्या प्रसिद्धीमुळे त्याला तब्बल ७५४२ पोस्टल मतदान झाले आहे. सनी देओलला झालेले पोस्टल मतदान हे पंजाब राज्यात सर्वाधिक आहे.

पंजाबमध्ये लोकसभा निवडणूक ही विविध मुद्यांनी गाजली. भाजपने ऐनवेळी यशस्वी खेळी करत सनी देओलला गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या मतदार संघात त्याचा मुकाबला काँग्रेसचे सुनील जाखड यांच्याशी झाला. निवडणुकीत सनी देओलने जाखड यांचा पराभव करत अधिक मतांनी विजय मिळविला.

अभिनेता सनी देओल याने बॉलीवूडमध्ये अनेक आशयप्रधान व देशभक्तीवर आधारित चित्रपटामध्ये भूमिका केल्या असल्याने त्याचे चाहते सर्वदूर आहेत. त्याचाच फायदा सनी देओलला झाला. निवडणुकीत सनी देओलला एकूण मतांपैकी तब्बल ७५४२ पोस्टल मतदान झाले आहे. या विजयात त्याचा चाहत्यांचाही नक्कीच वाटा असल्याचे दिसून येते.

Loading...
You might also like