सनी देओल आणि करिश्मा कपूर यांना 22 वर्ष जुन्या ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाचा ‘दिलासा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांना आज जयपूर एडीजे न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने दोघांना जवळपास 22 वर्ष जुन्या प्रकरणात मोठा दिलासा दिला. हे प्रकरण 11 मार्च 1997 च्या बजरंग या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान घडले होतो, यात चेन पुलिंगच्या प्रकरणात सनी देओल आणि कारिश्मा कपूरला आरोपी ठरण्यात आले होते.

या प्रकरणी रेल्वे न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात हे आरोप निश्चित केले होते. आरोप रेल्वे कलम 141, 145, 146 आणि 147 अंतर्गत निश्चित करण्यात आले होते. या विरोधात दोघांनी रिवीजन दाखल केली होती ज्यावर एडिशनल डिस्ट्रीक्ट जजने त्यांच्यावरील आरोप मुक्ती केली आहे. या प्रकरणी अधिवक्ता ए के जैन यांनी या दोघांची बाजू मांडली.

न्यायाधीश पवन कुमार यांनी निर्णय घेतला की, रेल्वे न्यायालयाने त्याच कलमांअंतर्गत आरोप निश्चित केले होते ज्यांना 2010 साली सेशन कोर्टाने रद्द केले. न्यायालयाचे म्हणणे आहे की दोघांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही. या प्रकरणी स्टंट मॅन टीनू वर्मा आणि सतिश शाह यांच्या विरोधात 2010 साली आरोप निश्चित करण्यात आले होते परंतू दोघांनी त्याविरोधात कोणतीही तक्रार दाखल केली नाही. नरेना मध्ये तत्कालीन स्टेशन मास्टर सीताराम मालाकर यांनी या प्रकरणी रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली होती.

कपिल शर्माच्या शो दरम्यान धर्मेंद्र यांनी सांगितले होती की त्यांच्या मुलाला शाळेत बुली म्हणले जात होते. त्यांनी सांगितले की त्यांना नुकतेच कळाले की करणचे काही सीनियर्स त्याला म्हणत धक्का देत असत की तू सनी देओलचा मुलगा आहेस मग तु सहज उठू शकत असेल.

धर्मेंद्र यांनी सांगितले की लोकांना वाटते की स्टार किड असेल याचा अर्थ असा नाही की ते वेगळे आहेत, त्यांनी सांगितले की या मुलांना वाटते की त्यांच्याशी सामान्य व्यवहार केला जावा. त्यामुळे ते परदेशात शिक्षण घेणे पसंद करतात.

Visit : Policenama.com