अभिनेत्यापासून नेता बनलेल्या सनी देओल यांना ‘तो’ खर्च भोवणार, खासदारकी ‘धोक्यात ‘ ?

गुरुदासपूर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या प्रचार खर्चावरून प्रसिद्ध अभिनेते सनी देओल हे आता अडचणीत सापडले आहेत. निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी नोटीस बजावली जाणार आहे. परिणामी देओल यांची खासदारकी धोक्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीकडून सनी देओल यांना पंजाबमधील गुरुदासपूर येथून लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. निवडणूक आयोगाने प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला ७०लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आखून दिली होती. मात्र सनी देओल यांनी प्रचारासाठी ८६ लाख रुपये खर्च केल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. सध्या निवडणूक आयोग सनी देओल यांच्या खर्चाचा हिशेब तपासत आहे. जर या प्रकरणात ते दोषी ठरले. तर त्यांची खासदारकी देखील रद्द होऊ शकते असे बोलले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन