भाजपने ‘सनी देओल’ला आणू किंवा ‘सनी लिओनी’ला, सर्व उडून जातील : राजकुमार चब्बेवाल

पंजाब : वृत्तसंस्था – कॉंग्रेसचे नेते राजकुमार चब्बेवाल यांनी भाजपाचे उमेदवार अभिनेते सनी देओलवर निशाणा साधला आहे. भाजपा निवडणुकीच्या रिंगणात सनी देओलला घेऊन येऊ द्या अथवा पॉर्नस्टार सनी लिओनीला. तरी ते जिंकू शकणार नाहीत. अशी टीका राजकुमार चब्बेवाल यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या ६ मे ला होणार आहे. याचदरम्यान अभिनेता सनी देओलने भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्याला भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. दरम्यान कॉंग्रेसचे नेते राजकुमार चब्बेवाल यांनी एका आयोजित पत्रकार परिषदेत सनी देओल यांच्यावर निशाणा साधला. त्यावेळी मोदी सरकार अपयशी ठरले आहे. त्यांना पंजाबमध्ये तीन जागांवर उमेदवार मिळाला नाही. भाजपाने गुरुदासपूरमधून सनी देओल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. मात्र, भाजापाने निवडणुकीच्या रिंगणात सनी देओल यांना घेऊन यावे अथवा सनी लिओनी हिला आणावे. काँग्रेसच्या वादळात सर्वजण उडून जातील. असे वक्तव्य त्यांनी केले.

विशेष म्हणजे, याआधी पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अभिनेता सनी देओल यांच्यावर निशाना साधला होता. सनी देओल केवळ फिल्मी असल्याचे सांगत, आपण असली फौजी असल्याचे त्यांनी म्हटले होते.