सनी देओलच्या मुलाच्या चित्रपटाची तारीख पुन्हा ‘चेंज’, ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. असे समजले आहे की, चित्रपट प्रदर्शित होण्याती तारीख पुन्हा बददली आहे. हा चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित होणार होता पण सनी देओल सध्या आपल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे या चित्रपटाची तारीख बदलून २० सप्टेंबर केली आहे. या चित्रपटातून करण पदार्पण करणार आहे. हा चित्रपट देओल परिवारासाठी खूप महत्वाचा आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत करण देओलला लॉंच केले जात आहे. त्याचबरोबर यामध्ये मुख्य भूमिका साकारणारी हिरोईन संहर बंबा असणार आहे. या चित्रपटाचे डायरेक्शन स्वतः सनी देओलने केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये तो विजयी झाला.

असे म्हणतात की, सनीने निवडणूकीत विजय मिळवल्यानंतर तो कामात खूपच व्यस्त झाला आहे. सनीने निवडणूकीच्या आधी चित्रपटाचे शुटिंग पुर्ण केले होते. पण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याला वेळ मिळाला नाही. सनीला बजट सत्रामध्ये देखील सहभागी होणे गरजेचे आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याला वेळ देता येत नाहीये. सनीने चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित करण्याचे ठरविले आहे.

चित्रपटाचे नाव सनी देओलचे वडिल धमेंद्र यांच्या सुपरहिट गाण्यावर आहे. जेव्हा ‘पल पल दिल के पास’ चित्रपटाचे नाव ठेवण्याचे ठरत होते तेव्हाच सनीने याला होकार दिला होता. धमेंद्र सोबतच हे गाणे सनी देओलला देखील खूप पसंत आहे. ‘

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like