लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर ‘हा’ लोकप्रिय अभिनेता गायब : नागरिकांनी केले ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील गुरुदासपूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. पण सध्या याच कारणाने त्यांच्यावर ट्रोल होण्याची वेळ आलीय. कारणही तितकेच महत्वाचे आहे. सनी देओल यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘यात त्याने म्हटले आहे कि, सध्या मी काजा (हिमाचल प्रदेश)च्या रस्त्यावर आहे. हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. मागच्या वर्षीही मी येथे आलो होता. चांगले लोक आणि उत्तम जेवण. मी अर्धा तास इथेच थांबणार. येथे येऊन खूप चांगले वाटले,’ यावरून नेटिझन्सनी त्यांना मोठ्या ट्रोल केले आहे.

 

मात्र या सगळ्यात हा व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा असल्याचे लोकांच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे सोशल मीडियात त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्याने Missing freedom #freedom. This is a year old video. असे देखील लिहिले आहे. यावर एकाने लिहिले कि, ‘जणू गुरूदासपूरमधील सगळ्या समस्या संपल्या आहेत. कदाचित म्हणून तुम्ही सुट्टीच्या मूडमध्ये आहात,’ तर एकाने म्हटले आहे कि, आपल्या मुलासाठी तो सध्या मुंबईत व्यस्त आहे, सर्व ठीक झाले कि, तो पंजाबमध्ये येईल.

दरम्यान, सनी देओल यांना भाजपने विनोद खन्ना यांच्या जागी गुरुदासपूरमधून काँग्रेसच्या सुनील जाखड यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. भाजपच्या बाजूने असणारे वातावरण यामुळे सनी देओलला हि निवडणूक जिंकल्यास अवघड गेली नाही.