सनी देओल बरोबर लग्नानंतर ‘ती’ का त्रस्त होती ? जाणून घ्या पूजा देओल बद्दल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड मधील अभिनेता शाहरुख, अक्षय, आमिर आणि सलमान आदी स्टार्सच्या खासगी जीवनाबद्दल प्रेक्षकांना बऱ्यापैकी माहिती आहे. या अभिनेत्यांच्या बरोबरीने त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीय माध्यमांमध्ये चर्चेत असतात. पण देओल कुटुंबातील अभिनेता आणि खासदार सनी देओल यांच्या खासगी जीवनाबद्दल फारच कमी जणांना माहिती असणार आहे.

अभिनेता धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल अशी त्याची सुरुवातीची ओळख होती. पण त्यानंतर त्याने स्वत:च्या अभिनयाच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनी देओलचा एक चाहता वर्ग आहे. पण बॉलिवूडचा अन्य स्टार्सप्रमाणे सनी देओलच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहित असणार आहे. सनी देओलचे लग्न कोणाबरोबर झाले ?, त्याची पत्नी काय करते ? या बद्दल फार कमी जणांना माहित असेल.

80-90 चा काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे सनी देओल. संवादफेक कौशल्यामुळे लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याचा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. सनी देओल सध्या राजकारणात चांगलाच सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. पंजाबमधून तो आता खासदार आहे. मुंबईतील जुहू येथे तो आई, पत्नी पूजा आणि दोन मुलांसोबत राहतो. सनी देओल पत्नी पूजा बरोबर फार दिसून येत नाही. पूजा देओलही प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहणे पसंत करते. हेमा मालिनी यांचा सावत्र मुलगा असलेल्या सनी देओलने गुपचूपपणे पूजा बरोबर विवाह केला होता.

पूजा आणि सनी देओलच 1984 साली लग्न झाले. पण लोकांना त्याबद्दल 1990 नंतर समजले.1990 साली पूजाच्या पोटी मोठा मुलगा करण देओलचा जन्म झाला. त्यानंतर माध्यमांमध्ये पूजा देओल हे नाव चर्चेत आले. पूजा पेशाने लेखिका असून सनी देओलच्या ‘यमला पगला दीवाना’चा स्क्रिनप्ले तिनेच लिहिला होता. लग्नाआधी पूजा देओलचे नाव लिंडा होते. ती मूळची ब्रिटनची नागरिक आहे. पूजा देओलचे वडिल भारतीय होते तर आई ब्रिटिश नागरिक होती.

प्रसारमाध्यमांनुसार, लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष पूजा आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये फारशी आनंदी नव्हती. सनी देओलच्या अफेअर्सच्या चर्चा हे त्यामागे कारण होते. सनी देओलचे नाव डिंपल कपाडिया, अमृता सिंह या अभिनेत्रींबरोबर जोडले जायचे. आता मात्र सनी आणि पूजा वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. या जोडप्याला दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव करण तर छोट्या मुलाचे नाव राजवीर आहे.