सनी कांबळे खून प्रकरण : संशयीत राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी जमीर रंगरेज फरार

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

संजयनगरमधील गुंड सनी कांबळे याच्या खूनप्रकरणातील संशयित राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी जमीर रंगरेज याने खून झालेल्या दिवशीच पोलिसांना चकवा दिला. घटना घडल्यानंतर त्याला नोटीस बजावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या शाखेत बोलावण्यात आले होते. त्याने येतो असे सांगितले मात्र त्यानंतर तो पसार झाला अशी माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याला ९ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16c47270-c980-11e8-86f5-39820beff228′]

सूरज ऊर्फ रमजान मौला शेख (वय १९ रा. अहिल्यानगर) असे शनिवारी अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहाजणांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य सूत्रधार असलेल्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, रंगरेजच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक मिलींद पाटील यांनी सांगितले.
गुंड सनी कांबळे याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी इमाम ऊर्फ जिच्या शेख, संदीप भोसले, अक्षय मोहिते, धनाजी बुवनूर, रफीक शेख यांना गुरुवारी अटक केली. त्याशिवाय यातील मुख्य सूत्रधार अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले होते. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B071HC9KBN,B07191JTQD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2495bd9f-c980-11e8-a569-c5891aa1e53c’]

बुधवारी सकाळी माधवनगर रस्त्यावरील दुर्गामाता मंदिराच्या पिछाडीस सनी कांबळेचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून डोक्यात कुकरीचे सात ते आठ वर्मी घाव घालून खुनी हल्ला करण्यात आला होता. रात्री सातच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, हल्लेखोर असलेल्या अल्पवयीन मुलास कवठेमहांकाळ येथे पाठलाग करून पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अन्य पाच संशय्तिांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली.

चार जणांचा खून करणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हल्ल्यानंतर अहिल्यानगरमध्ये पेढे वाटले…

दरम्यान, बुधवारी सकाळी सनी कांबळेची गेम करण्यात आली. मात्र त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला नव्हता. त्याचदिवशी रात्री सातच्या सुमारास उपचार सुरू असताना सनीचा मृत्यू झाला. मात्र, सनीवर हल्ला केल्यानंतर काहींनी अहिल्यानगर परिसरात पेढे वाटले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पेढे वाटणार्‍यांचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.