सनी लिओनी दिसणार आणखी एका साऊथच्या चित्रपटात 

मुंबई : वृत्तसंस्था – नेहमी आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री सनी लिओनी लवकरच प्रेक्षकांना साऊथच्या एका चित्रपटात लीड रोलमध्ये दिसणार आहे. या आगामी चित्रपटाचे नाव आहे, ‘मधुरा राजा’. या चित्रपटात सनीला साऊथ मेगास्टार ममूटीच्या अपोझिट साईन करण्यात आले आहे. याआधी २०१८ मध्ये सनी साऊथच्या ‘वीरमादेवी’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील सनीची भूमिका  प्रेक्षकांना आवडली होती.

‘मधुरा राजा’ चित्रपट तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतही रिलीज होणार आहे. सनी व ममूटी यांच्याशिवाय सुकुमराना, अतुल कुलकर्णी, पृथ्वीराज व शमा कासीम असे अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अद्याप या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. पण लवकरच ती होईल, असे कळतेय.

इमेज बदलण्यासाठी आपण साउथ इंडस्ट्रीत जाणार असल्याचे सनी मध्यंतरी म्हणाली होती. त्यामुळे सनी लिओनीला पॉर्न स्टार इमेज असल्याचा पश्चात्ताप होत असल्याची चर्चा लोकांमध्ये रंगली होती. परंतु ही चर्चा सनीने फेटाळून लावली होती. पॉर्न स्टार या इमेजचा मला अजिबात पश्चाताप नाही, उलट मला याबद्दल स्वत:चा अभिमानचं जास्त वाटतो, असे सनी म्हणाली होती.