काय सांगता ! होय, सनी लिओननं चक्क महाराष्ट्र सरकारच्या ‘त्या’ विशेष योजनेचा घेतला लाभ, जाणून घ्या नेमकं काय केलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   काही दिवसांपूर्वी अर्थव्यवस्थेला चालना सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं घर खरेदीदारांसाठी स्टँप ड्युटीमध्ये मोठी सूट जाहीर केली होती. या योजनेची ३१ मार्च हि शेवटची मुदत होती. या योजनेचा अनेकांनी लाभ घेतला असून यामध्ये कलाकारही मागे राहिले नाहीत. या योजनेअंतर्गत अभिनेत्री सनी लिओन हीनं मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे एका आलिशान इमारतीतल १२ व्या मजल्यावर १६ कोटींचं घर खरेदी केलं आहे. २८ मार्च २०२१ रोजी तिनं घर खरेदी केल्याचं वृत्त मनी कंट्रोलनं दिलं आहे.

घर खरेदीवर आकारल्या जाणाऱ्या स्टँप ड्युटीचे दर राज्य सरकारनं कमी करून ३ टक्के केले होते. याच योजनेनुसार तिने स्टँप ड्युटीत देण्यात आलेली सूट पकडून तब्बल ४८ लाख रूपयांचा भरणा करत २८ मार्च रोजी आपल्या घराची नोंदणी केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिमेकडे असलेल्या दोन एकर जागेत क्रिस्टल ग्रुपच्या टीयर २ बिल्डरद्वारे उभारलेल्या अटलांटिस नावाच्या इमारतीत १२ व्या मजल्यावर सनीनं घर खरेदी केलं. ५ बीएचके हा एक फ्लॅट असून त्याचा कार्पेट एरिया ३,९६७ चौरस फूट इतका आहे. यासोबत तीन पार्किगच्या जागादेखील अपार्टमेंटमध्ये आहेत. बाजार मूल्यानुसार या अपार्टमेंटची किंमत जवळपास ४० हजार रूपये प्रति चौरस फूट इतकी आहे.अशी माहिती स्थानिक ब्रोकरनं मनी कंट्रोलशी बोलताना दिली.