#VideoViral : अरबाज खानच्या ‘त्या’ प्रश्नावर सनी लिओनीला रडू कोसळलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकेकाळी पॉर्न स्टार म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेत्री सनी लिओनीने आज बॉलिवूड मध्ये आपले वेगळे स्थान तयार केले आहे. सौंदर्यासोबतच सनी लिओनी उत्तम डान्सरही आहे. सनी लिओनी लोकप्रियताही खूप वाढली आहे. नुकताच सनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात ती रडताना दिसत आहे. अरबाज खानच्या पिंच या चॅट शोमध्ये तिने हजेरी लावली होती. त्यावेळी सनीला अरबाजने एक प्रश्न विचारला. त्यानंतर त्या प्रश्नाला उत्तर देताना सनी इमोशनल झाल्याचे दिसून आले. सनीला रडू आल्याचं पाहायला मिळालं.

अरबाजने सनीला तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरील चाहत्यांच्या कमेंटविषयी काही प्रश्न विचारले. त्यानंतर एक प्रश्न ऐकून सनीला अश्रू अनावर झाले. 2018 मध्ये आपल्या सहकाऱ्याला मदत आर्थिक करण्याविषयी सनीने एक पोस्ट टाकली होती. यावर काहींनी टीका केली होती. ‘सनी गर्भश्रीमंत असून देखील ती 20 लाखांची मदत करू शकत नाही का ?’ असेही प्रश्न काहींनी कमेंट्समध्ये विचारले होते. याबाबत बोलताना इमोशनल होत सनी म्हणाली की, “मी प्रभाकरला अखेरपर्यंत मदत करत राहिले मात्र त्याला वाचवू शकले नाही.” असे म्हणत सनीने खंत व्यक्त केली. यावेळी तिला अश्रूही अनावर झाले होते.

पुढे बोलताना सनी म्हणाली की, “प्रभाकर माझ्या टीमपैकी एक होता. तो माझ्या कुटुंबातील एक भाग असल्यासारखाच होता. आमच्यासोबत तो नेहमीच वावरायचा. मी नसताना प्रभाकर माझ्या टीमची आणि घराची काळजी घ्यायचा. त्याची किडनी निकामी झाल्याचं समजलं तेव्हा आम्ही साऱ्यांनीच त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.

शक्य झाली तशी आर्थिक मदतही केली होती. मात्र त्याच्यावर या आजारपणासोबतच त्याच्या कुटुंबाचीही जबाबदारी होती. त्यामुळे त्या परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले परंतु त्याला वाचवू शकले नाही.” असं सनी अरबाजच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली.