पॉर्न इंडस्ट्री, बॉलिवूडनंतर आता ‘बेबी डॉल’ सनी लिओनी ची ‘शिक्षकी’ पेशात’एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची बेबी डॉल आणि लाखोंच्या मनावर राज्य करणारी सनी लिओनी लवकरच मुंबईत शाळा सुरु करत आहे. यासाठी तिने जागाही निवडली आहे. जुहूमध्ये ही जागा आहे. फक्त मुंबईतच नाही तर देशभरात ती 25 शाळा सुरु करणार आहे. बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रीमध्ये सनी लिओनीचे नाव घेतले जाते. हीच हॉट सनी लिओनी आता शिक्षकी पेशात प्रवेश करणार आहे. काहींना वाटत असेल की, ती शिक्षिकेचा रोल तर करणार नाही ना. ती खरखरंच शाळा सुरु करणार आहे.

सनी लिओनी सुरु करत असलेल्या शाळांमध्ये मुलांच्या कल्पकता आणि कलागुणांना वाव देणारे उपक्रम राबवण्यात येणार आहे. सनी लिओनी यासाठी लवकरच शिशुवर्ग सुरु करणार आहे. सनी लिओनी मुंबईतल्या जुहूमध्ये पहिला शिशवर्ग सुरु करणार आहे. सनी लिओनी देशभरात असे 25 शिशुवर्ग सुरु करणार आहे.

असे समजत आहे की, सनीची दत्तक मुलगी निशाकडून सनीला शाळा सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. या शाळेचे म्हणजेच शिशुवर्गाचे स्वरु नेमके कसे असेल यावर सध्या सनी लिओनी काम करत आहे. लवकरच ती शिशुवर्गाच्या नावाची घोषणा करणार आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती रंगीला या सिनेमातून मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. याशिवाय सनी कोका कोला या सिनेमातही झळकणार आहे. याव्यतिरीक्त सनी अर्जुन पटीयाला या सिनेमातही एक आयटम नंबर करताना दिसणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त