Sunny Leone चक्क #TikTok व्हिडीओ करणाऱ्या ‘या’ तरुणाच्या प्रेमात ; घेतला तरुणाचा शोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्हाला वाचून कदाचित विश्वास बसणार नाही परंतु अभिनेत्री सनी लिओनी सध्या टिकटॉक या व्हिडीओ अॅपवर व्हिडीओ करणाऱ्या मुलाच्या प्रेमात आहे. तिला एका टिकटॉक व्हिडीओची भुरळ पडली आहे. सनीला एक तरुणाचा व्हिडीओ इतका आवडला की, तिने त्या तरुणाचा शोध घेतला. शिवाय त्याच्यासोबत सनीने टिकटॉक व्हिडीओही केले आहेत.

शेजादा कक्कर असं या तरुणाचं नाव आहे. सनीला या तरुणाचं व्हिडीओ खूपच आवडलं. सनीने तिच्या इन्स्टाग्रामवर टीकटॉकचे तीन-चार व्हिडीओ पोस्ट केले आहे. या तरुणाबाबत बोलताना सनी लिओनी म्हणते की, “कोणालाही न जुमानता बिन्धास्तपणे आणि आत्मविश्वासाने टिकटॉक व्हिडीओ करणाऱ्या या तरुणाचं मी कौतुक करते. मी आणि माझ्या टीमने या तरुणाला शोधून काढलं. आमच्यासोबत काही व्हिडीओ करण्यासही त्याने होकार दिला.” असं सनी म्हणाली.

सनीने इन्स्टाग्रामवर तीन-चार व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओत सनीला तिचा पती डॅनिअल वेबरने साथ दिल्याचे दिसत आहे. दरम्यान सनीने रईस चित्रपटातील लैला, दलेर मेहंदी यांच्या बोलो तारा रारा, आणि तनू वेड्स मनू चित्रपटातील साड्डी गल्ली या गाण्यांवर सनीने टिकटॉक व्हिडीओ केले आहेत आणि ते तिच्या चाहत्यांसाठी तिने शेअरही केले आहेत.

सनी लिओनीने पोस्ट केलेलेृ व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले असून लाखो लोकांनी तिच्या व्हिडीओजला लाईक केले आहे. अनेक आपल्या भावना व्यक्त करत सनीच्या व्हिडीओवर कमेंट्सही केल्या आहेत.