‘या’ सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू करणार सनी लिओनी ; सनीचा मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या आपल्या साऊथ डेब्यू सिनेमामुळे चर्चेत असल्याचं दिसत आहे. सनी काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सनीने साऊथमध्ये डेब्यू करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच सनी आणि साऊथच्या सिनेमात झळकणार आहे. सनी आता टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

एका मुलाखतीत बोलताना सनी लिओनी म्हणाली की, “मी लवकरच रंगीला सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू करणार आहे. नकुतंच मी एक छोटंसं शेडयुल पूर्ण केलं आहे. हे खूपच उत्साहपूर्ण आहे. तिथले लोक खूपच चांगले आहेत. याव्यतिरीक्त आणखीही एक साऊथचा चित्रपट आहे.” असेही सनीने मुलाखतीत बोलताना सांगितले.

या मुलाखतीत बोलताना सनीने स्त्रीवादावरही आपलं मत मांडलं. ती खूप खुश असल्याचंही तिने यावेळी सांगितले. यावेळी बोलताना सनी म्हणाली की, “मुलांचा चेहरा पाहूनच माझा दिवसभराचा थकवा दूर होतो. त्यांची एक स्माईल माझा खराब मूडही चांगला करतो. आता मी माझ्यापेक्षा त्यांच्यावर जास्त लक्ष देते. जिंदगीची सगळी झंझट एका बाजूला आणि माझी मुलं एका बाजूला. माझ्या दृष्टीकोनातही बराच बदल झाला आहे.” असेही सनीने म्हटले आहे.

पुढे बोलताना सनी म्हणाली की, “मी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप काही गमावलं आहे आणि खूप काही कमावलं देखील आहे. मी नेहमीच सांगत असते की मी माझे स्वप्न जगत आहे. मी खूप नशीबवान आहे की, मला हे काम करण्याची संधी मिळाली आहे. मी माझ्यातील कमतरतेला माझी ताकद बनवले आहे. माझ्या संपूर्ण प्रवासात मला माझ्या पतीची मोलाची साथ लाभली आहे.

You might also like