लग्नाच्या वाढदिवशी सनी लिओनीने पतीसोबत केले असे काही… फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आज (दि 11 एप्रिल) सनी आणि डॅनियल यांचा विवाह झाला होता. आजचा लग्नाचा वाढदिवस सनीने खास अंदाजात साजरा केली. पती डॅनियल आणि आपल्या तीन मुलांसह तिने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.

दरम्यान यंदाचा सनी आणि डॅनियल यांच्या लग्नाचा वाढदिवस हा 8 वा वाढदिवस आहे. सनीने तिच्या लग्नाचे प्रायव्हेट सेलिब्रेशन केले आहे. या खास दिवशी त्यांनी केक कापत आपला आनंद व्यक्त केला आणि वाढदिवस साजरा केला आहे.

लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सनीने आपल्या खास क्षणांचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या फोटोंना 9 लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. अनेकांनी सनीला कमेंट करत शुभेच्छाही दिल्या आहेत.

आपल्या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना सनीने या फोटोंना खास कॅप्शनही दिले आहे. कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे की, “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डॅनियल. तू माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेस. तू माझा एक चांगला मित्र आणि आपल्या मुलांचा चांगला पिता आहेस. आणखी एक अभिमानाची गोष्ट अशी की, आपल्या मुलीनेच आपल्यासाठी हे केक तयार केला आहे.” यानंतर हा फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचे फोटो विशेष आवडताना दिसत आहेत.