‘बेबी डॉल’ सनी लिओनी ‘हॉटनेस’मुळे नाही तर ‘या’ कारणामुळे सोशलवर ‘चर्चेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिचा एखादा हॉट फोटो किंवा व्हिडीओ नाही तर तिची संपत्ती हे आहे. एके काळची टॉपची पॉर्न स्टार असलेल्या सनीने आज बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान तयार केले आहे. तिने अनेक हिट सिनेमात काम केले आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सनी लिओनीकडे 97 कोटींची संपत्ती आहे. मुंबईत तिचा 3 कोटींचा बंगला आणि अनेक परदेशी महाग गाड्या तिच्याकडे आहेत. इतकेच नाही तर परदेशात तिची 30 कोटींची स्थावर मालमत्ता आहे.

सनीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, 2011 मध्ये डॅनियल वेबरसोबत लग्न केलेल्या सनीला सरोगसीच्या माध्यमातून 2018 साली दोन जुळी मुले झाली आहेत. याशिवाय 2017 मध्ये सनीने निशा नावाच्या मुलीला दत्तक घेतले. सनी सोशल मीडियावर नेहमची सक्रिय असते. मुलांसोबतचे आणि डिनियल सोबत अनेक फोटो ती सोशलवर शेअर करत असते. कधी हॉट फोटोंमुळेही ती चर्चेचा हिस्सा बनते.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, 7 वर्षांपूर्वी जिस्म 2 या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सनी आता रंगीला या मल्याळम सिनेमाच्या शुटींगमध्ये बिजी आहे.

View this post on Instagram

😘

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

View this post on Instagram

Good night everyone!! Xoxo

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

 

You might also like