‘बेबी डॉल’ सनी लिओनीचा ‘हॉट’ लूक आता ‘नेपाळी’ गाण्यातही ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पॉर्नस्टार सनी लिओनी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेमध्ये असते. सनी कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोंमुळे चर्चेमध्ये असते. सनीने आपल्या स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. लाखांपेक्षा जास्त चाहते तिला फॉलो करत असतात. सनी सोशल मिडियावर देखील खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे सेक्सी फोटो चाहत्यांना शेअर करत असते. तिचे फोटो चाहते लाइक करत असतात.

सनी लिओनीने चित्रपटसृष्टी सोडून शिक्षण क्षेत्रामध्ये पाऊल टाकले आहे. याचा अर्थ असा नाही की, सनी इंडस्ट्रीला अदविदा करणार. ती लहान मुलांसाठी शिक्षण देण्यासाठी स्कूल सुरु करण्याच्या विचारात आहे. त्याचबरोबर सनी एका नेपाळी चित्रपटात देखील झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘पासवर्ड’ आहे. सनीने ही माहिती स्वतःच्या ट्विटरवर सांगितली आहे. हा चित्रपट १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर सनीने ट्विटमध्ये ‘एबी इंटरनॅशनल ८’ , ‘अमित बस्नेट’ चे आभार मानले आहे.

https://youtu.be/TGNlBS9xXtI

सनी अजून एक चित्रपट ‘कोका कोला’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती महेंद्र धारीवाला करणार आहे. या चित्रपटामध्ये सनी लिओनीसोबत बिग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करीमी झळकणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख अजून ठरली नाही पण या चित्रपटासाठी चाहत्यांची खूप उत्सुकता दिसून येत आहे. सध्या सनी मल्याळम चित्रपट ‘रगीला’ मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामधून ती मल्याळम चित्रपटात पाऊल टाकणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त