सनी लिओनी ‘आमदार निवास’ मध्ये   

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन
सनी लिओनी आमदार निवासात आली होती. ही घटना मुंबईतली आहे. सकाळी दहा वाजता आलेली सनी रात्रीपर्यंत या निवासात होती. इतकंच नव्हे, तर एका मराठी गाण्यावर तिने ठुमकेही लागवले. यावेळी अस्सल मराठमोळ्या वेशभूषेत सनी  दिसली. काही महिन्यांपूर्वी आलेल्या शांताबाई… या गाण्यावर सनी थिरकली आणि उपस्थितांना वेड लावलं.
ही घटना खरी आहे मात्र  खरंखुरं आमदार निवास नसून तो आहे “आमदार निवास” नावाचा एक आगामी मराठी सिनेमा आहे. संजीव राठोड दिग्दर्शित या सिनेमाचं शूट सध्या अंधेरीत चालू आहे. त्यातल्या एका गाण्यासाठी सनीला बोलावण्यात आलं होतं. आता ती आमदार निवास या सिनेमासाठी गाणं करते आहे.
काही महिन्यांपूर्वी गाजलेलं शांताबाई या गाण्यावर हा नाच असून, अस्सल मराठमोळ्या वेशभूषेत सनी दिसेल. गोरेगावच्या स्टुडिओ मध्ये हे शूट पार पडलं. तिच्यासोबत या गाण्यात अभिनेता मंगेश देसाई, सयाजी शिंदेही असणार आहेत. गाण्याचं शूट नुकतंच संपलं असून, पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
 [amazon_link asins=’B0751LYPY3,B076HL1FRV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’10ee8794-b5ac-11e8-a2ea-118de61b983f’]

सनी लिओनीने यापूर्वी बॉईज या सिनेमासाठी कुठं कुठं जायाचं हनीमूनला या गाण्यावर नाच केला आहे. हा चित्रपटही  कमालीचा हिट झाला होता.