Photos : ‘बेबी डॉल’ सनीनं शेअर केले स्विमिंग पूलमधील Hot फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल ॲक्ट्रेस सनी लिओनी (Sunny Leone) अनेकदा आपल्या हॉटनेसमुळं चर्चेत येताना दिसत असते. हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याचा जणू तिचा छंदच आहे. खास बात अशी की, सनीनं फक्त फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेच तो व्हायरल होताना दिसत असतो. यावेळीही सनी चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा सनीनं तिच्या हॉटनेसनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सनीनं तिच्या इंस्टारून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती नेहमीप्रमाणे बोल्ड आणि हॉट अवतारात दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं येलो कलरची बिकिनी घातली आहे. सनी स्विमिंग पूलमध्ये एक से बढकर एक पोज देताना दिसत आहे.

सनीचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती हॉरर कॉमेडी सिनेमा कोका कोला, रंगीला, वीरमादेवी, हेलेन आणि कोटीगोब्बा 3 अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे. हे सर्व सिनेमे साऊथ इंडस्ट्रीतील आहेत असं समजत आहे. याशिवीाय ती एमएक्स प्लेअरवरील बुलेट्स (Bullets) या वेब सीरिजमध्येही काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती.