‘..म्हणून आवडतो सनी लिओनीला महेंद्रसिंग धोनी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – क्रिकेट विश्वात ‘कॅप्टन कुल’ म्हणून आपली ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीचे फॅन कोण नाही ? धोनीचा देशातच काय परदेशात देखील मोठा फॅन फॉलोईंग आहे. अभिनेत्री सनी लिओनीला देखील अनेक क्रिकेटपटूंच्या यादीत महेंद्रसिंग धोनीच जास्त आवडतो. धोनीच आवडण्यामागचे तिने दिलेले करणं देखील तितकेच रंजक आहे. एका क्रिकेट वेबसाईटचे उद्धाटन सनीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तिने आपल्या आवडत्या क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी विषयी संगितले.

सनी लिओनीला तुला कोणता क्रिकेटपटू आवडतो? असे विचारले होते. तेव्हा साहजिकच ती, विराट कोहली, रोहित शर्मा अशांची नावं घेईल असे सगळ्यांना वाटले होते. मात्र तिने कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतले. तो तिला का आवडतो हे कारण देखील खूपच रंजक होते. यावेळी बोलताना सनी म्हणाली, ‘धोनी हा एक फॅमिली मॅन आहे. धोनीची मुलगी झिवा ही फारच क्यूट आहे. मी धोनी आणि झिवाचे काही फोटो पाहिले. फारच सुंदर त्या दोघांचे फोटो आहेत. त्यामुळे मला सर्व खेळाडूंमध्ये धोनी सर्वात जास्त आवडतो.’

धोनी ३७ वर्षांचा असला तरी युवा खेळाडूला लाजवेल, असा त्याचा फिटनेस आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून धोनीने आपला लौकिक कायम राखला आहे. काही दिवासांपूर्वी धोनीला विश्वचषकाच्या संघात खेळवायचे का, यावर बरीच चर्चा सुरु होती. धोनीवर बरीच टीकाही झाली. पण धोनीने आपल्या कामगिरीच्या जोरावर टीकाकारांच्या तोंडाला कुलूप लावले. आता धोनी हा भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला आहे आणि त्याच्याशिवाय विश्वचषकात भारतीय संघ खेळू शकत नाही, असे काही जणांचे म्हणणे आहे.

You might also like