बिटकॉइन घोटाळा प्रकरणी आता सनी लिओनी, नेहा धुपिया यांची चौकशी ?

मुंबई:पोलीसनामा ऑनलाईन

बोटकॉइन घोटाळाप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राजा कुंद्रा याच्या नावानंतर आता बॉलिवूड मधील अनेक नावे या प्रकरणात पुढे येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकरणात आता अभिनेत्री सनी लिओनी, नेहा धुपिया, झरीन खान, सोनल चौहान, हुमा कुरेशी यांच्यासह अनेकांनी बीटकॉईनचं प्रमोशन केल्याचा दावा केला जात आहे.

राज कुंद्रांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 तास चौकशी केली.जवळपास 2 हजार कोटींच्या या घोटाळ्यात, ईडीने राज कुंद्रा यांना समन्स बजावले होते .बिटकॉईन व्यवहारातील बेहिशेबी संपत्ती प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी राज कुंद्रा यांना प्रश्न विचारले. त्यांच्याकडून केल्या गेलेल्या चौकशी दरम्यान आता बॉलिवूडच्या गुलदस्त्यातील बरीच नावे पुढे येण्याची शक्यता आहे.

अमित भारद्वाजच्या चौकशीदरम्यान अनेक नावे उघडकीस

क्रिप्टो करन्सी अर्थात आभासी चलन ,बिटकॉईन प्रकरणात पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला अटक केली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत बॉलिवूडमधल्या अनेकांची या घोटाळ्यात नावे बाहेर आली. याच घोटाळ्यात राज कुंद्राचं नाव बाहेर आल्यानंतर, इडीनं राज कुंद्राला चौकशीसाठी मुंबईत बोलावले होते . अमित भारद्वाज या मुख्य आरोपीने एक वेबसाईट सुरु करुन अनेकांना कोट्यवधींचा चुन्हा लावला आहे. नांदेडमध्ये देखील बिटकॉईन कंपनीचा अनेकांना कोट्यवधींचा गंडा, घातल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने बिटकॉईन व्यवहार अवैध ठरवले आहेत. शिवाय या आभासी चलन व्यवहारावर बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे यातील घोटाळे उघडकीस येत आहेत . त्यामुळेच बिटकॉईनमधील बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीने राज कुंद्रा यांची चौकशी केली.