#Video : पॉर्न स्टार बनण्याच्या निर्णयावर सनी लिओनी म्हणते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसत आहे. यावेळी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचे पॉर्न स्टार बनणे हे आहे. नुकतीच सनी लिओनी अरबाज खान याचा चॅट शो पिंचमध्ये आली होती.

यावेळी तिने अरबाज सोबत खुलुन गप्पा मारल्या. यानंतर आता सनी पुन्हा चर्चेत आली आहे. या शो मध्ये सनीने सध्याच्या लाईफसोबतच तिच्या आधीच्या प्रोफेशनविषयीदेखील खुलून गप्पा मारल्या. यावेळी तिने तिच्या खासगी आयुष्याबाबतही अनेक गप्पा मारल्या.

अशातच एक कमेंट आली होती की, सनीला अंदाज आला होता की, पॉर्न बॅन होणार आहे. यामुळेच तिने समजदारी दाखवत योग्य वेळेला आपले करिअर शिफ्ट केले. यालाच उत्तर देताना सनी लिओनी म्हणाली की, “हो मी दूरदर्शी आहे.” ट्रोलर्सला उत्तर देण्याशिवाय सनीने या एपिसोडमध्येच अॅडल्ट स्टार होण्याचा तिचा निर्णय आणि मागील आयुष्याबाबतही बोलताना दिसली. सनी म्हणाली की, “मी माझ्या आयुष्यात तेच निर्णय घेतले आहेत जे त्यावेळी माझ्यासाठी योग्य होते.”

एकेकाळी पॉर्न स्टार म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेत्री सनी लिओनीने आज बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान तयार केले आहे. सौंदर्यासोबतच सनी लिओनी उत्तम डान्सरही आहे. सनी लिओनीची लोकप्रियताही खूप वाढली आहे.

Loading...
You might also like