जेव्हा सनी लिओनीच्या सेटवर अचानक रक्तानं माखलेला हात पडतो… (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी इन्स्टाग्रामवर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. यावेळेस तिने इन्स्टाग्रामवर सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अचानकपणे सेटवर रक्तानं माखलेला हात येऊन पडला आणि सर्वांचीच भीतीनं गळण उडाली असे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सनीने शेयर केलेल्या या व्हिडीओमध्ये काही लोक राउंड टेबल मिटिंग करत असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात अचानक एक रक्तानं माखलेला हात सनीच्या खांद्यावर पडतो. लाल रंगाचा हा हात पाहून सनी घाबरते. मात्र हा खराखुरा रक्तानं माखलेला हात नाही तर एक प्रॅन्क आहे.

स्वतःसोबत घडलेली गोष्ट सनीने सहकाऱ्यांसोबत केली. याबाबतचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, आम्ही सर्वांनी प्रॅन्क करण्याचं ठरवलं होतं आणि आम्ही त्यात यशस्वी सुद्धा झालो. या व्हिडीओमध्ये सनी आणि तिची टीम चर्चा करताना दिसत आहे तर ती नोटपॅडवर काही नोट काढताना दिसत आहे. मात्र अचानक सनी बॅगमधून तोच लाल रंगाचा हात उभ्या असलेल्यांच्या दिशेनं भिरकावते. अचानक आलेल्या या हातामुळे उपस्थित सर्वजण घाबरतात. मात्र नक्की काय झालं हे लक्षात येताच सर्वजण हसू लागतात.

सनी लिओनीचा जन्म कॅनडामध्‍ये झाला असून तिचे पूर्ण नाव करणजीत कौर आहे. तिच्‍या खासगी आयुष्‍यावर बॉयोग्राफीदेखील बनली होती. सनीचे आयुष्‍य संघर्षमय राहिले आहे. परंतु, तिने आपल्‍या अभिनयाने इंडस्‍ट्रीत एक वेगळी ओळख बनवली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like