‘बेबी डॉल’ सनीची मुलगी निशा शिकतेय ‘हॉर्स रायडींग’ ! अ‍ॅक्ट्रेसनं शेअर केला फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अॅक्ट्रेस सनी लिओनी गेल्या काही दिवसांपासून सनी आपल्या हॉट फोटोंमुळं चर्चेत येताना दिसत आहेत. हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याचा जणू तिनं सपाटाचं लावला आहे. खास बात अशी की, सनीनं फक्त फोटो शेअर करायचा उशीर असतो की, ते लगेच व्हायरल होताना दिसत असतो. पुन्हा एकदा सनीचा एक फोटो शेअर केला आहे. परंतु हा फोटो तिचा नसून तिची मुलगी निशाचा आहे.

सनीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात तिची मुलगी निशा घोड्यावर बसलेली दिसत आहे. सनी निशाला हॉर्स रायडिंगचे लेसन देत आहे. फोटो शेअर करताना सनी म्हणते, “मी माझ्या मुलीला पहिल्या रायडिंग लेसनसाठी नेलं होतं. तिला पाहून वाटत होतं की, ती लहानशी पण प्रोफेशनल मुलगी आहे. खूप छान निशा. मला तुझा अभिमान आहे.

सनीनं शेअर केलेला हा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. खास बात अशी की, डोक्यात हेल्मेट पायात शुज घालून ऐटीत घोड्यावर बसलेली निशा खूपच क्युट दिसत आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती कोका कोला आणि हेलेन अशा सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शोदेखील करत आहे.