तब्बल 3 महिन्यांनंतर जीमला गेली ‘बेबी डॉल’ सनी, ‘असं’ केलं Workout ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अॅक्ट्रेस सनी लिओनी गेल्या काही दिवसांपासून सनी आपल्या हॉट फोटोंमुळं चर्चेत येताना दिसत आहेत. हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याचा जणू तिनं सपाटाचं लावला आहे. खास बात अशी की, सनीनं फक्त फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेच तो व्हायरल होताना दिसत असतो. पुन्हा एकदा सनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे.

सनीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सनी जीममध्ये दिसत आहे. एक्सरसाईज करताना तीनं हा व्हिडीओ शुट केला आहे.

लॉस एंजेलिसमध्ये लॉकडाऊन दरम्यान लागू केलेले नियम काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. यात जीम ओपन करण्यात आल्या आहेत. याचाच फायदा घेत सनी जीममध्ये पोहोचली आहे. व्हिडीओत दिसत आहे की, तिन तोंडाला मास्क लावलं आहे. सनीचा हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती कोका कोला आणि हेलेन अशा सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शोदेखील करत आहे.