तैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तीन मुलांची आई आहे. ती आपला फ्री टाइम मुलांसोबत घालविते. सनी लिओनी अनेकदा आपला मुलगा अशरला कडेवर घेतलेली दिसून आली आहे. जेव्हापासून अशर मिडियाच्या नजरेमध्ये आला आहे तेव्हापासून त्याची तुलना करिना कपूरचा लाडका मुलगा तैमूरशी केली जात आहे.

image.png
प्रत्येकजण अशर तैमूरसारखा दिसतो असे म्हणत आहे. याबद्दल आत्तापर्यंत करिनाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही पण जेव्हा सनी लिओनीला या गोष्टींवर विचारले गेले तेव्हा तिने परफेक्ट उत्तर दिले.

image.png

https://www.instagram.com/p/BslSuDphhjD/

https://www.instagram.com/p/BvzUJWQFMmj/

नुकतेच काहींनी सनी लिओनीला विचारले की, तुझ्या मुलाची तुलना तैमूरशी केली जात आहे यावर तुझे काय म्हणणे आहे. या प्रश्नांवर सनी लिओनीने उत्तर दिले की, ‘हो अशी तुलना होत आहे. अशरचा चेहरा गोल आहे त्यामुळे तो तैमूरसारखा दिसतो. सोशल मिडियावर जे वाटते ते तो करतो. तैमूर ही खूप सुंदर मुलगा आहे आणि अशर ही खूप क्यूट आहे.’ सनी लिओनी तीन मुलांची आई आहे. २०१७ मध्ये तिने निशाला दत्तक घेतले. यानंतर २०१८ मध्ये सरोगेसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली. तिच्या मुलांचे नाव अशर आणि नोआ आहे.

image.png

प्रोफेशनलबद्दल बोलायचे म्हणले तर सनी लवकरच हॉरर चित्रपट ‘कोकाकोला’ दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सनी उत्तर प्रदेशातील भाषा बोलताना दिसणार आहे. सनीच्या या अंदाजाचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. या व्यतिरिक्त सनी ‘वीरमादेवी’ आणि ‘हेलेन’ चित्रपटात दिसणार आहे. याची शूटिंग सुरु आहे. हे दोन्ही साउथ चित्रपट आहेत.
आरोग्यविषय वृत्त –

Loading...
You might also like