मुंबईत येताच ‘बेबी डॉल’ सनीचा ‘कहर’ ! अवतार पाहून ओळखणंही कठिण

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी (Sunny Leone) कोरोना (Covid-19) संसर्ग सुरू झाल्यानंतर लॉस एंजेलिसला (Los Angeles) गेली होती. सनी आता पुन्हा मुंबईत परतली आहे. 6 महिन्यांनी पर आलेल्या सनीनं इंस्टावरून पोस्टही शेअर केली आहे. इतकंच नाही तर हा अनुभव अ‍ॅडव्हेंचरस असल्याचंही सनीनं सांगितलं आहे.

सनीनं तिच्या इंस्टावरून फोटो शेअर केला आहे. यात ती खूप वेगळीच दिसत आहे. यावेळी सनीनं शेअर केलेला लुकही खूप हटके दिसत आहे. काहींना तर ती ओळखूही येणार नाही असाच काहीसा सनीचा लुक दिसत होता.

सनी मुंबईत येण्यासाठी खूप आतुर झाली होती. सनीनं एका मुलाखतीत हे बोलूनही दाखवलं होतं. आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू झाल्यानंतर मुंबईला परतेन असं ती म्हणाली होती.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच तीहॉरर कॉमेडी सिनेमा कोका कोला, रंगीला, वीरमादेवी आणि हेलेन अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवीाय ती एमएक्स प्लेअरवरील बुलेट्स (Bullets) या वेब सीरिजमध्येही काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती.